एसटी काॅलनी फाजलपूरा येथे अज्ञातांची शाॅपवर दगडफेक, परिसरात शांतता, पोलिसांची घटनास्थळी धाव

 0
एसटी काॅलनी फाजलपूरा येथे अज्ञातांची शाॅपवर दगडफेक, परिसरात शांतता, पोलिसांची घटनास्थळी धाव

एसटी काॅलनी फाजलपूरा येथे अनोळखी लोकांची दगडफेक, परिसरात शांतता, पोलिसांची घटनास्थळी धाव.

घटनास्थळी दगड, पिशवीत दगड भरलेले दिसून आले.

औरंगाबाद, दि.29(डि-24 न्यूज) आज सायंकाळी 7 ते 7.30 वाजेच्या दरम्यान अज्ञातांनी एसटी काॅलनी फाजलपूरा येथील जफर मर्चंट यांची Marchant Trendz लेडीज वेअर शाॅपवर दगडफेक केल्याने खळबळ उडाली. दुकानाच्या समोरील काचेवर दगडफेक केल्याने कुटुंबात घबराट पसरली. हि दुकान मर्चंट यांची पत्नी चालवते व महीला कामगार येथे काम करतात. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. दोन इसमांनी चेह-यावर रुमाल बांधून दगडफेक केली. घटनास्थळी एसिपी संपत शिंदे व सिटी चौक पोलिस दाखल झाले त्यांनी पंचनामा केला. लवकरच हल्लेखोर अटक केली जाईल. परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका शांतता राखावी असे आवाहन त्यांनी केले आहे. जफर मर्चंट यांनी यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले माझे घर दुकानाच्या बाजूला आहे महाविकास आघाडीचे माझ्या घरात बैठक झाली. इंडिया आघाडीच्या उमेदवाराला आमच्या सोशल ग्रुपने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मला जीवे मारण्याची धमकी, तुम्ही त्यांचा प्रचार केला तर घर जाळून टाकू अशा धमक्या दिल्या. यानंतर तोंडाला कपडा बांधून अज्ञातांनी दुकानावर दगडफेक केली. या हल्ल्यामागे कोण आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, माझ्या कुटुंबाला जीवाचा धोका आहे. आरोपिंना तात्काळ अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख, इलियास किरमानी, डॉ.शोएब हाश्मी यांनी यावेळी घटनास्थळी येऊन माहिती घेतली व घटनेची चौकशी करून तात्काळ आरोपिंना अटक करावी. आरोपी कोणत्या पक्षाशी संबंधित आहे याची चौकशी झाली पाहिजे. निवडणूक निरीक्षक, जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त यांची भेट घेणार आहेत. अजून निवडणूक सुरू झाली आहे सुरुवातीलाच अशा घटना शांतताप्रिय शहरात होत असेल तर आम्ही या घटनेचा निषेध करतो.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow