ऑपरेशन टायगरची विरोधकांना भीती का...? केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची टिका

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची ठाकरे सेनेवर टीका...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आज शहराच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे सेनेवर सडकून टीका केली. त्यांनी सांगितले महाकुंभ हा श्रद्धेचा भाग आहे त्यात पाप धुवायचीच म्हटली तर खा. संजय राऊत व ठाकरे सेनेचे धुतली पाहिजे असे त्यांचे नाव न घेता खासदार राऊत व ठाकरे सेनेचा खरपूस समाचार समाचार घेतला. जाधव हे केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी जनजागृतीपर कार्यक्रमाच्या दृष्टीने शहरात आले होते. यावेळी त्यांनी खा. संजय राऊत यांना 9 वाजेचा भोंगा असे संबोधले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही खासदार, मंत्री व आमदार फेब्रुवारीत प्रयागराजला महाकुंभात स्नान करण्यासाठी जाणार असल्याच्या बातम्या झळकल्यावर खा. राऊत यांनी त्यावर टीका केली होती की मिंदे सेना आता पाप धुवायाल जाणार आहेत यावर प्रतिउत्तर देताना जाधव यांनी वरील टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महायुतीचे आमदार आणि खासदारांना लोकसभा-विधानसभेच्या महाकुंभात मोठे यश मिळाले आहे. ते अजून विरोधकांना पचनी पडत नाहीय. मतदारांनी दोन्ही वेळा मोजमाप करत मतांचा कौल त्या लोकशाहीच्या कुंभमेळयात दिला. शुद्ध शिवसेना कोणती याच उत्तर दिले आहे. खोटी शिवसेना कोणती याच उत्तर जनतेने निवडणुकीत दिले आहे. प्रयागचा कुंभमेळा 144 वर्षांनी होत आहे. कुंभमेळा धार्मिक विधी आहे, रोज करोडो लोक संगमावर जात आहेत. आपण धार्मिक विधी मानतो, म्हणून संस्कृती म्हणून आपण जातो, धर्माला मानणारा माणूस जातो, खर तर त्यांनीही तेथे डुबकी मारावी.
ऑपरेशन टायगरची भिती का..? असाही टोला जाधव यांनी लगावला.
दिल्लीत अधिवेशन काळापासूनच ऑपरेशन टायगरची भिती विरोधकांना आहे. त्यांच्यात भीती आहे की कोण फुटेल...? त्यांच्या सर्वोच्च नेत्यांचा खासदार-आमदारांवरील असलेला आत्मविश्वास ढासळला आहे. मतांवर अविश्वास आहे असेही ऑपरेशन टायगर बाबत बोलताना प्रतापराव जाधव यांनी टीका केली.
Y+ दर्जाची सुरक्षा काढल्यानंतर...
राज्य शासनाने, केंद्ग शासनाने विविध मंत्री खासदार व आमदार यांची Y+ सुरक्षा काढली यावर जाधव म्हणाले की सुरक्षा आम्ही मागितली नव्हती, मात्र कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे सुरक्षा यंत्रणेचे काम असल्याने सुरक्षा दिली. मात्र आमच्या गाड्या वेगाने पळतात आणि पोलिसांच्या गाड्या आमचे कार्यक्रम झाल्यावर पोहचतात. त्या सुरक्षेचा तसाही फायदा नव्हताच आम्हाला असे सांगून यावर जाधव यांनी हशा पिकवला....
उध्दव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येणार नाही....यावर जाधवांचे भाष्य...
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येतील अशा बातम्या येत आहेत यावर ते म्हणाले, तो त्या दोन भावांचा प्रश्न आहे, मात्र राज ठाकरे का बाहेर पडले ते आधी पाहावे लागेल असे सांगून एकत्र येण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले.
What's Your Reaction?






