औरंगाबादचे नाव वाचवण्यासाठी न्यायालयीन लडाईसोबत राजकीय लडाई पण लढणार - हिशाम उस्मानी
औरंगाबादचे नाव वाचवण्यासाठी न्यायालयीन लडाईसोबत राजकीय लडाई पण लढणार - याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.11(डि-24 न्यूज) औरंगाबाद नामांतर विरोधात सर्वोच्च न्यायालयात आमची याचिका अगोदर दाखल केली होती. आमची याचिका बोर्डावर येण्याच्या अगोदर याचिकाकर्ते मुश्ताक अहमद यांनी याचिका दाखल करुन सुनावणीसाठी 9 ऑगस्टला ठेवण्यात आली. अगोदर त्यांनी याचिका टाकणार नाही असे आम्हाला आणि इतरांना पण कळवले होते म्हणून समाजाच्या सर्व संमतीने आम्ही याचिका दाखल केलेली होती याची त्यांना कल्पना असूनही त्यांनी याचिका दाखल केली. दोन्ही याचिकेवर सुनावणी एकत्र घेण्यात यावी यासाठी आम्ही दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालो, पण आमची याचिका त्यांच्या सोबत टैग केली नाही. सुनावणीसाठी सिनिअर कौन्सिलची नियुक्ती अगोदरच करावी लागते म्हणून आम्हाला इतका एऐ वेळी सीनियर कौन्सिल लावता आला नाही. तसे त्या दिवशी न घडता त्यांच्या ज्या वकीलाने याचिका दाखल केली तेही कोर्टात उपस्थित नव्हते. यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त करत त्यांची याचिका फेटाळली. आमच्या याचिकेवर 10 ते 15 दिवसांत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे. सिनिअर कौन्सिल नियुक्त करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आम्ही औरंगाबादचे नाव वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहोत. आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्हाला सर्वोच्च न्यायालयाशी आहे. महाविकास आघाडी व महायुती दोन्हीमधील घटक पक्षांनी आतून बाहेरून नामांतराला पाठिंबा देऊन साथ दिली आहे व एमआयएमनेही पण यात शांत राहून आतून समर्थन दिला. न्यायालयीन लडाईसोबतच आम्ही राजकीय लढा पण आपल्याला द्यावा लागेल. आगामी विधानसभा निवडणुकीत यांचा भांडाफोड करु अशी माहिती पत्रकार परिषदेत याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांनी दिली आहे.
आज आपल्या लिगल टिमसोबत त्यांनी पत्रकार परिषदेत नामांतराच्या न्यायालयीन लढ्यातबाबत माहिती दिली.
जेष्ठ वकील एस.एस.काझी यांनी बाॅम्बे उच्च न्यायालयात कसा लढा दिला व सर्वोच्च न्यायालयात नाव वाचवण्यासाठी याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी हे कसा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्या प्रयत्नांना कशी खिळ बसवली जात आहे यावर प्रकाश टाकला. कोणी रेव्ह्यू पेटीशन टाकली तर त्याप्रकरणी सुनावणी होत नाही तर न्यायाधीश द्वारा फक्त ऑफिस मधे फाईल बघितली जाते यामध्ये जास्त करुन सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आतापर्यंत असे घडले नाही परंतु आमच्या याचिकेवर सुनावणीची अपेक्षा वाचलेली आहे. जी याचिका फेटाळली गेली यामुळे आमच्या आत्मविश्वासावर पण काहीसा परिणाम झाला तरीही आम्ही डगमगणार नाही आम्ही प्रसिद्ध सिनिअर कौन्सिल उभा करून न्यायाची अपेक्षा करत आहोत अशी माहिती त्यांनी दिली आहे.
यावेळी जेष्ठ वकील खान सलिम खान यांनीही आपले मत मांडले.
याप्रसंगी याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी, अॅड एस.एस.काझी, अॅड खान सलिम खान, अॅड मोईन, अॅड मंदार मुल्ला, अॅड अक्रम इनामदार, अॅड राहिल कादरी, सय्यद हमीद, नाजिम अन्सारी, अहेमद मोहीयोद्दीन, सय्यद राहील, वसीम शेख, शेख मोबीन, मो.अशफाक, मिनाज मन्सूरी, इरफान खान, मोहम्मद अझहर आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?