काही निती धोरणे घेवूनच महायुतीमध्ये सहभागी झालो- प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे

 0
काही निती धोरणे घेवूनच महायुतीमध्ये सहभागी झालो- प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे

काही निती-धोरणे घेवूनच महायुतीमध्ये सहभागी झालो आहोत - प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे

शरद पवारांविषयी आमच्या मनात संभ्रम नाही...

औरंगाबाद, दि.26(डि-24 न्यूज) देशात आणि राज्यात 1995 सालापर्यंत एकाच पक्षाचे सरकार निर्विवादपणे येत होते. परंतु 1995 नंतर राज्यात युती आणि आघाडीचे सरकारे स्थापन झाली आहेत. युती आणि आघाडीचे सरकार स्थापन करतांना सर्वच पक्ष काही निती-धोरणे घेवून सरकारमध्ये सहभागी होत असतात. त्याच धर्तीवर आम्ही देखील काही निती आणि धोरणे घेवूनच महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये सहभागी झालो असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. शरद पवार हे आमचे सर्वोच्च नेते असून त्यांच्याविषयी आमच्या मनात कोणत्याही प्रकारचा संभ्रम नसल्याचा दावा देखील खा.तटकरे यांनी यावेळी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे शनिवारी शहरात आले होते. गारखेडा परिसरातील वंजारी मंगल कार्यालयात कार्याकर्त्यांचा मेळावा झाल्यानंतर खा.तटकरे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतरच 2 जुलै रोजी आम्ही केंद्रातील एनडीए सरकारमध्ये तर राज्यातील महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर झपाटून आपल्या कामास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यासाठी राज्यभर दौरे कारुन पदाधिकारी व कायकर्त्यांचा मेळावा घेण्यात येणार असून त्याची सुरूवात रविवारी (दि.२७) बीड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेने होणार असल्याचे खा.तटकरे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार साहेब हे वेगवेगळी विधाने करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण करीत असून ते संभ्रम का निर्माण करीत आहेत याचा खुलासा देखील तेच करतील असे प्रदेशाध्यक्ष खा.तटकरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात बोलतांना सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल सुरू असून पक्ष कोणत्याही परिस्थितीत अडचणीत येणार नाही असा दावा देखील तटकरे यांनी यावेळी केला.

या पत्रकार परिषदेस आ.सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.सुनिल मगरे, शहराध्यक्ष अभिजित देशमुख आदींची उपस्थिती होती.

पुढे काय म्हणाले तटकरे... पक्ष-चिन्ह आमच्या गटाला मिळणार...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि पक्ष म्हणून आमच्याच गटाला मान्यता मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या निकालाकडे आमचे लक्ष असल्याचे देखील तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

संभाजी भिडेवर कारवाई व्हायला पाहीजे...

देशातील आणि राज्यातील महापुरूषांविषयी तसेच संविधानाविषयी नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये करणार्‍या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे गुरूजी यांच्यावर कारवाई व्हायला पाहीजे असे देखील प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात बोलतांना सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow