कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रदीप जैस्वाल यांचे पालकमंत्र्यांना निवेदन...

 0
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रदीप जैस्वाल यांचे पालकमंत्र्यांना निवेदन...

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आ.प्रदीप जैस्वाल यांचे पालकमंत्र्यांना निवेदन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज)- औरंगाबाद मध्य मतदारसंघाचे आमदार प्रदीप शिवनारायण जैस्वाल यांनी अलीकडेच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना निवेदन सादर करून शहरातील प्रस्तावित विकास आराखड्यातील विविध प्रकल्पांना गती देण्याची मागणी केली आहे.

या निवेदनात त्यांनी येत्या सिंहस्थ कुंभमेळा –2027, नाशिक या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील भाविक व पर्यटक येणार असल्याने, त्यांच्या सोयीसाठी शहरातील पर्यटनस्थळे, रस्ते, वाहतूक आणि सार्वजनिक सुविधा यांचे सर्वांगीण उन्नतीकरण करण्यावर भर देण्यात यावा, असे नमूद केले आहे.

आमदार जैस्वाल यांनी प्रस्तावित केलेल्या विकास कामांमध्ये खालील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत:

बाबा पेट्रोल पंप ते दिल्ली गेट ते हर्सूल टि पाँईट रस्त्याची सर्वकष सुधारणा करणे.

हर्सूल टि पाँईट ते जटवाडा रामा 217 रस्त्यावरील स्मृती वन ते अंबरहिल पर्यंत रस्त्याची सर्वकष सुधारणा करणे.

शहरातील हरिसध्दी माता मंदिर, श्री.गोगानाथ बाबा टेकडी, श्री निपटनिरजंन मंदिर, श्री हनुमान टेकडी, बीबी का मकबरा, पाणचक्कीकडे जाणा-या रस्त्यावरील मकाई गेट व महेमुद गेट जवळील पुलाच्या शेजारी नविन पुल बांधणे.

उज्जैन येथील चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य यांनी भारतातील दुसरे श्री हरसिध्दी माता मंदिर हर्सल येथे बांधले आहे. त्यामुळे या मंदिराचे विशेष महत्व आहे. करिता या मंदिराचे संवर्धन व परिसराचा विकास करणे.

शहरात विविध ठिकाणी स्वच्छता गृह बांधणे. मोबाईल टॉयलेट, वाहतूक बेटाचे सौदर्यकरण करणे, तीर्थक्षेञ व पर्यटन स्थळांकडे जाणा-या रस्त्यांवर पथदिवे बसविणे तसेच दिशा दर्शक फलक आदि. कामे करणे गरजेचे आहे.

तिर्थक्षेञ व पर्यटन स्थळ येथे प्रथमोपचार केंद्रे उभारणे, रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे.

सद्यस्थितीत असलेले मध्यवर्ती बसस्थानकाचे नुतनीकरण करणे व रस्त्याचे डांबरीकरण व सिमेंट कॉक्रीटीकरण करणे.

तिर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाकडे येण्या-जाण्यासाठी परीवहन महामंडळाची जास्तीच्या बसेसची व्यवस्था करणे.

मध्यवर्ती बसस्थानकाची नविन इमारतीची उभारणी करणे.

नविन शासकिय विश्रामगृह बांधणे तसेच हिमायतबागेच्या मागील बाजूस असलेल्या शासकिय जमीनीवर नविन अद्यावत विश्रामगृह / भक्त निवास बांधणे.

परिवहन महामंडळाच्या बसस्थानकावर, रेल्वेस्थानकावर प्रथोमोपचार केंद्रे उभारणे.

शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय व जिल्हा शासकिय रुग्णालय येथे अद्यावत ट्रॉमा केअर सेंटर, वार्ड, उभारणे व मुबलक प्रमाणात औषधीचा साठा उपलब्ध करणे.

नाशिक ते छञपती संभाजीनगर रेल्वेच्या फे-या वाढविणे तसेच नविन रेल्वे सुरु करणे.

छञपती संभाजीनगर शहरात अनेक पर्यटक येण्याची शक्यता असल्याने छञपती संभाजीनगर शहरातील सकाळी 5 वाजेपर्यंत खानावळीचे हॉटेल सुरु ठेवण्यास परवानगी देणे.

भाविकांसाठी मल्टीलेव्हल पार्किंगची व्यवस्था करणे.

मुख्य मार्गावर असलेल्या पार्किंग मध्ये ई.व्ही. चार्जिंग स्टेशन उभारणे.

शहरातील मुख्य रस्त्यावरील महावितरण कंपनीच्या उच्चदाब /लघुदाब / रोहीञ व पोल स्थलांतरीत करणे.

मुख्य रस्त्यावर सौर ऊर्जा पथदिवे बसविणे.

नव्याने विकसित होणा-या रस्त्यावर स्मार्ट वाहतूक साकेतांक, दिशादर्शक फलक, कमान उभारणी करणे.

महावितरणचे शहरातील सिडको हडको भाग, जिल्हापरिषद मैदान औरंगपुरा, हर्सुल, जाधववाडी येथे नविन सबस्टेशन उभारणे.

आमदार प्रदीप जैस्वाल यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले की, “छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वाचे ठिकाण असून, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे शहर पर्यटन केंद्र म्हणून उदयास यावे, यासाठी समन्वयित विकास आराखडा आवश्यक आहे.”

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow