कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर अवैध बांधकाम, काम बंद करण्यासाठी एमआयएमचा राडा...!
 
                                कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर अवैध बांधकाम, काम बंद करण्यासाठी एमआयएमचा राडा...!
एमआयएमचे शिष्टमंडळ मनपात धडकताच मुख्य
 
येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले, लोखंडी पुल मार्ग व लिफ्टहि बंद करण्यात आली...तगडा पोलिस बंदोबस्त तैनात
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)
जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू असलेले अनाधिकृत बांधकाम तात्काळ थांबवावे. या कामाच्या सुधारित आराखड्यास मंजूरी देण्यात येवू नये या मागणीसाठी एमआयएमचे शिष्टमंडळ आज दुपारी मनपात धडकले. जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोकळ्या जागेवर रहदारी साठी असलेला रस्ता छोटा करुन पार्किंगच्या जागेवर अवैध बांधकाम व प्लाॅटींग सुरु केल्याने याचा त्रास आडत व्यापारी, फळ व भाजी मार्केटच्या व्यापा-यांना होत आहे. अवैध बांधकाम होत असल्याची लेखी तक्रारी मनपा प्रशासनाला दिली तरीही कार्यवाही होत नसल्याने एमआयएम अक्रामक झाली. प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांनी महापालिका मुर्दाबाद, बाजार समिती मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर राडा केला. कार्यवाही बाबत अतिक्रमण विभागप्रमुख वाहुळ यांनी माहिती देण्यासाठी शिष्टमंडळाला वेळ दिला होता पण ते उपलब्ध झाले नसल्याने अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. दोन दिवसांनंतर स्थळ पाहणी करुन अतिक्रमणाची कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी एमआयएमचे नेते नासेर सिद्दीकी यांनी मनपा प्रशासनावर आरोप लावला सत्ताधारी आमदार, व नेते यांच्या दबावामुळे कार्यवाही न करण्यासाठी दबाब आणला जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन व संचालक मंडळ जमीनी विकून खात आहे. या अवैध बांधकामामुळे मालवाहतूक गाड्यांना वाहतूक करण्यासाठी रस्ता छोटा झाल्याने व व्यापा-यांना सुविधा मिळत नसल्याने येथे व्यापार करने कठीण झाले आहे. 1/4/2025 रोजी तक्रार अर्ज मनपा प्रशासनाला दिला होता परंतु अधिका-यांनी कोणतीही दखल न घेतल्याने हे शेवटचे स्मरण पत्र कार्यवाहीसाठी देत आहोत. सेल हाॅल क्रं.5 समोर चालू असलेले अनाधिकृत बांधकाम 48 तासांचे आत थांबवण्यात यावे तसेच जो नियमांचे उल्लंघन करुन रिवाईज प्लान कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दिलेला आहे त्याला कोणतीही मंजूरी देवू नये नसता एमआयएमच्या वतीने बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा नासेर सिद्दीकी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी माजी शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, युवा शहर अध्यक्ष मोहंमद असरार, माजी नगरसेवक जमिर अहेमद कादरी, विकास एडके, प्रातोष वाघमारे, फेरोज खान, आरेफ हुसेनी, शेख रफीक, हाजी इसाक खान, समीर कुरेशी, आडत व्यापारी हरि पवार, राकेश जैन, इसा सेठ, मुसा सेठ, ऑल इंडिया ट्रकर्स एण्ड ड्रायव्हर्स हेल्पलाईन असोशिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद इस्माईल, जिल्हाध्यक्ष वजीर शहा, एम.एम.एम.पठाण, कैसर शहा व भाजी विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            