कैसर खान विधानसभा निवडणुक लढण्यास इच्छुक, राष्ट्रवादीकडे मागितली उमेदवारी...!
 
                                कैसर खान विधानसभा निवडणुक लढण्यास इच्छुक, राष्ट्रवादीकडे मागितली उमेदवारी
मनमिळावू स्वभावामुळे परिचित, सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत चांगले संबंध असल्याने त्यांच्या समर्थकांनी यंदा विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केली आहे...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.15(डि-24 न्यूज) मागिल 20 वर्षांपासून राजकारणात व समाजकारणात सक्रीय असलेले माजी नगरसेवक कैसर खान यांनी विधानसभा निवडणुकीत इच्छुक असल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शहरात आले असता त्यांची भेट घेऊन औरंगाबाद पूर्व अथवा औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे.
शहराध्यक्ष असताना कैसर खान यांनी सन 1999 विधानसभा निवडणुकीत त्यांनी समाजवादी पक्षाच्या वतीने निवडणूक लढली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यापासून एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांनी पक्ष कधी सोडला नाही. वार्ड क्रमांक 40, नवाबपूरा वार्डातून तीनदा नगरसेवक म्हणून वार्डाचा सर्वांगिण विकास केला. सन 1984 ते 1994 पर्यंत मुस्लिम लिग मध्ये कार्यरत होते.
नेहरुनगर, कैसर काॅलनी वार्डातून नगरसेवक निवडणूक लढले. महीला आरक्षित बुढीलेन वार्डात 2016 मध्ये झालेल्या पोटनिवडणूक अतितटीची झाली. सर्व शहराचे लक्ष या वार्डाच्या निवडणुकीकडे असताना राष्ट्रवादीसाठी येथून विजयश्री खेचून आणल्याने हि निवडणूक चर्चेत आली होती. त्यांचे शहरातील विकासात मोलाचे योगदान आहे. शहरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असल्याने दोन्ही विधानसभा मतदारसंघात त्यांचा तगडा जनसंपर्क असल्याने शहरातील नागरीकांकडूही त्यांनी निवडणूक लढण्यास आग्रह होत असल्याचे बोलले जात आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            