खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रास राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार

 0
खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रास राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार

खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रास राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार

        

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज) वैद्यकीय संस्थामध्ये स्वच्छता व संसर्ग नियंत्रण तसेच वैद्यकीय सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी केद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कायाकल्प पुरस्कारांमध्ये छ.संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची छाप पडली आहे. जिल्हयातील 13 प्राथमिक आरोग्य केद्र तसेच 26 आरोग्य वर्धिनी केंद्रास कायाकल्प जाहीर झाला आहे.

सन 2023-24 या वर्षातील कायाकल्प पुरस्कारांची घोषणा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. यामध्ये छ.संभाजीनगर येथील बाजारसावंगी प्राथमिक आरोग्य केद्रास प्रथम क्रमांकाचा कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराची रक्कम रु. 2 लाख रुपये आहे. त्याच सोबत प्राथमिक आरोग्य केंद्र गणोरी, आळंद, जातेगांव, बाबरा, वेरुळ, गदाना, दौलताबाद, पिंपळवाडी,कचनेर, सि.वाडगांव, चापानेर, करंजखेडा या 12 प्राथमिक आरोग्य केद्रांना उत्तेजनार्थ प्रत्येक रु.50 हजाराचे पारीतोषिक मिळाले आहे. तसेच किनगांव आरोग्य वर्धिनी केंद्रास 1 लाख पुरस्कार जाहीर झाला आहे. परिबावडा आरोग्य वर्धिनी केंद्रास रु.50 हजार प्रथम उत्तेजनार्थ तसेच पार्थी आरोग्य वर्धिनी केंद्रास रु. 35 हजार व्दितीय उत्तेजनार्थ पुरस्कार तसेच तिसगांव, सुलतानपुर, जेहुर, टाकळीराजा, बहीरगांव, पाडाळी, कृष्णापुर, बोकुडजळगाव, मंगरुळ, पंढरपुर, चौका, डिग्गी, जिकठाण, पिसादेवी, आडगांव बु., सोलनापुर, चिंचडगाव, जटवाडा, सावंगी, माळीवडगांव, येसगांव, गेवराई बु., घटांब्री, वाकला या आरोग्य वर्धिनी केंद्रांना उत्तेजनार्थ प्रत्येकी रु.25 हजाराचे पारीतोषिक प्राप्त झाले आहे.

ग्रामीण नागरीकांना चांगल्या आरोग्याच्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी आरोग्य विभाग कटिबध्द आहे. यासाठी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन श्री विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.छ.संभाजीनगर, डॉ अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.छ.संभाजीनगर, यांनी केले तसेच डॉ विनायक मुंढे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. वासेफ सिददीकी जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक यांनी याबाबत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना वेळावेळी मार्गदर्शन केले व संबंधीत प्राथमिक आरोग्य केद्र व आरोग्य उपकेंद्र कर्मचारी यांनी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow