खुलताबाद तालुक्यात टवाळखोरांवर दामिनी पथकाची कारवाई...!
खुलताबाद तालूक्यात ठिकठिकाणी 18 टवाळखोरांवर दामिनी पथकाची कारवाई.
खुलताबाद, दि. 17(डि-24 न्यूज) महिला व मुलिंच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थापन करण्यात आलेल्या दामिनी पथकाने छेडखानी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम उघडली आहे यात दामिनी पथकाने खुलताबाद तालुक्यात ठिकठिकाणी एकाच दिवशी सात टवाळखोरांवर कारवाई केली असून या कार्यवाहीमुळे मुली व महिलांविरुद्ध होणाऱ्या घटनांना आळा बसणार आहे.
सध्या श्रावण महिना सुरू झाला आहे त्यात पावसाळा सुरू आहे खुलताबाद तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्याने म्हैसमाळ सुलिभंजन वेरूळ परीसरातील डोंगर भाग हिरवेगार झाले आहे त्यामुळे खुलताबाद तालुक्यातील सर्वच पर्यटन स्थळावर पर्यटकांची व श्रावण महिन्यामुळे मंदिर परीसरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. खुलताबाद तालुक्यातील पर्यटन स्थळावर व मंदिर परीसरात
महिलांविरुद्ध व मुली विरूद्ध होणाऱ्या घटनांना प्रतिबंध होण्याच्या उद्देशाने दामिनी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी सोमवार रोजी एकाच दिवशी वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर परिसरात, भद्रा मारुती मंदिर परिसरात तसेच म्हैसमाळ येथील पर्यटन स्थळावर 7 टवाळखोरांवर कारवाई केली आहे. दामिनी पथकाच्या कार्यवाहीने सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणारे व दारू पिऊन उनाडक्या करणारे तसेच महिला व मुलिंना पाहून असशील चाळे करणाऱ्या टवाळखोरांना मोठा वचक बसला आहे.
महिलांविरुद्ध होणाऱ्या घटनांना प्रतिबंध होण्याच्या उद्देशाने पोलिस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण यांनी दामिनी पथकाची स्थापना केली आहे. 1 जुन ते 6 ऑगस्ट दरम्यान 18 छेडखानी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. खुलताबाद तालुक्यातील व शहरातील संवेदनशील ठिकाणी दामिनी पथका ने गस्त घालून, भेट दिली आहे शहरातील विविध संवेदनशील ठिकाणी प्रभावी पेट्रोलिंग करून एकूण प्रेमीयुगुलांवर व छेडखानी करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई केली जात आहे.
---------------------------------
मुलींनो हे नंबर सेव्ह करा...
9529659983 / 112
--------------------------------
छेडछाडीसारखा अचानक काही प्रसंग उद्भभावल्यास तात्काळ मदती करिता दामिनी पथकाचा हेल्पलाईन क्रमांक 9529659983 किंवा 112 क्रमांकावर पोलीसांना संपर्क करावा, असे आवाहन दामिनी पथकातर्फे महिला व मुलींना तसेच नागरिकांना माहिती देण्यात आली आहे.
परिसरात टवाळखोर किंवा संशयीत ईसमांचा वावर दिसल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा असे अवाहन दामिनी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी केले आहे, खुलताबाद तालुक्यात ठिकठिकाणी टवाळखोरांवर कार्यवाही
सह पोलीस अंमलदार जयश्री महालकर, मंजुषा हातकंगणे, सीता ढाकणे, कपिल बनकर , इरशाद पठाण यांनी ही कामगिरी केली आहे.
What's Your Reaction?