खैरेंना अगोदर स्वपक्षातील नेत्यांसोबत लढावे लागेल - आमदार संजय सिरसाट
 
                                खैरेंना अगोदर स्वपक्षातील नेत्यांसोबत लढावे लागेल - आमदार संजय सिरसाट
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.27(डि-24 न्यूज) शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे हे जेष्ठ नेते आहेत त्यांचा मी सन्मान करतो. त्यांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा बोलून दाखवली त्यांना माझ्या शुभेच्छा आहे. लोकशाहीत त्यांना उभे राहण्याचा अधिकार आहे. मतदार ठरवतील कोणाला आमदार करायचे. उबाठा गटात त्यांना विश्वासात न घेता त्यांना न विचारता भाजपाचे एका नेत्याने उबाठा गटात प्रवेश केला. हा प्रवेश उमेदवारी साठी झाला होता का मग उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षातीलच नेत्यांसोबत त्यांना भांडावे लागेल. विधानसभेनंतर महापालिकेची निवडणूक आहे कोणती लढायची त्यांनी ठरवावे. त्यांना लोकसभेत कोणी पाडले ते बघावे. अशी टिका शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार संजय सिरसाट यांनी केली आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            