घरगुती गॅस 50 रुपयांनी महागला, पेट्रोल डिझेलचे उत्पादन शुल्क वाढले, विरोधीपक्षाची टिका
 
                                 
घरगुती गॅस 50 रुपयांनी महागला, पेट्रोल डिझेलचे उत्पादन शुल्क वाढले, विरोधीपक्षाची टिका
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज) आज घरगुती गॅस सिलिंडरचे दर 50 रुपयांनी वाढले आहे तर केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवर दोन रुपये उत्पादन शुल्क वाढवले आहे यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार नाही तर पेट्रोलियम कंपन्या हा भार उचलणार असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिप पुरी यांनी दिली. गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने घराच्या बजेटवर याचा परिणाम होणार आहे. आता गॅस सिलेंडर 853 रुपयांना मिळणार आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक्स हॅन्डलवर प्रतिक्रिया देत सरकारवर टीका केली आहे. त्यांनी लिहिले "आज घरगुती गॅस 50 रुपयांनी महागले. भक्तांनी औरंगजेबाची कबर खणावी...समाधी समाधी करावी.. आणि लोकांचे खिसे कापणा-या या असल्या निर्णयाचे स्वागत करावं..बोला जय श्रीराम जय श्रीराम !
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            