चोरीचे दोन क्रुझर, एक पिकअप असा 8 लाखांचा मुद्देमाल जप्त, वाहनचोरी करणारी टोळी जेरबंद
वाहन चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद...
8,10,000/- मुद्देमाल जप्त....
औरंगाबाद, दि.25(डि-24 न्यूज) रोजी गणेश भिमराव गाडे वय 45 वर्षे रा. लासुरगाव रोड, यांनी शिल्लेगाव पोलीस ठाणे येथे तक्रार दिली कि, दिनांक 22 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास त्यांची फोर्स क्रुझर जिप क्रमांक MH-20, DV0062 ही त्याचे राहते घराचे समोरून कोणी तरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली आहे. या तक्रारीवरून भादंवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांचे मार्गदर्शनानुसार नमुद वाहन चोरीच्या गुन्हयांचा पोलीस ठाणे शिल्लेगाव यांचे सोबत स्थानिक गुन्हे शाखा तपास करित असतांना श्री सतिष वाघ, पोलीस निरीक्षक यांना गोपनीय बातमीदारा मार्फेत माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा शिर्डी येथील संतोष उर्फे गणेश शंकर शिंदे याने केला आहे.
यावरुन स्था. गु.शाखेच्या पथकांने तात्काळ शिर्डी येथे जावून कालिकानगर परिसरात सापळा लावला असता तेथे संशयीत संतोष उर्फे गणेश शंकर शिंदे हा फिरताना आढळून आल्याने पथकांने त्याचेवर अचानक झडप घालून त्यास ताब्यात घेतले. त्यास चोरीच्या वाहना बाबत विचारपुस करता तो पोलीसांना उडवा उडवीचे उत्तरे देवू लागल्याने त्याचेवर अधिक संशय बळावल्याने त्यास विश्वासात घेवुन कसोशिने विचारपुस करता त्यांने नमूद वाहन हे त्याचे साथीदार नामे साईनाथ रघुनाथ कचरे व परमेश्वर भिमराव अंभोरे यांचे साथीने चोरी केले असून ते जालना येथे लपवुन ठेवल्याची कबुली दिली.
यावरुन पथकाने लागलीची शिर्डी येथील साईनगर मधुन साईनाथ रघुनाथ कचरे यास शिताफिने ताब्यात घेतले तसेच जालना येथील चंदिनझिरा परिसरात तिसरा आरोपी परमेश्वर भिमराव अंभोरे हा पोलीसांना मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन वाहना बाबत विचारपुस करता त्यांने चोरी केलेली वाहने ही जालना येथील भवानी नगर परिसरात लपवुन ठेवल्याचे सांगितले यावरून भवानीनगर परिसराची पोलीसांनी कसुन पाहणी केली असता तेथे या टोळीने चोरी केलेली तीन वाहने ज्यात दोन क्रुझर जीप व एक लोडींग पिकअप वाहन असा एकुण किंमत 8, 10,000/- मुद्देमाल मिळुन आला आहे.
या टोळीने पोलीस ठाणे वैजापुर, शिल्लेगाव, नेकनुर जि.बिड येथुन सुध्दा वाहने चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले असुन यातील सराईत आरोपी नामे संतोष उर्फे गणेश शंकर शिंदे रा. शिर्डी यांचेवरीत आतापर्यत जालना, अहमदनगर, औरंगाबाद येथे चोरी 42 गुन्हे दाखल आहेत.
नमुद आरोपी नामे संतोष उर्फे गणेश शंकर शिंदे वय 28 वर्षे रा. कालकानगर शिर्डी ता. राहता जि. अहमदनगर , साईनाथ रघुनाथ कचरे, वय 23 वर्षे रा. साईनगर शिर्डी, ता. राहता जि. अहेमदनगर, परमेश्वर भिमराव अंभोरे वय 28 वर्षे रा. चंदनझिरा, जालना यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यांचे कडुन अधिक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील तपास शिल्लेगाव पोलीस करित आहेत.
नमुद कारवाई पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल कृष्णा लांजेवार, यांचे मार्गदर्शनाखाली श्री सतिष वाघ, पोलीस निरीक्षक, भगतसिंग दुल्हत, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार नामदेव सिरसाठ, दिपेश नागझरे, संजय घुगे, वाल्मिक निकम, अशोक वाघ, दिपक सुरोसे, योगेश तरमाळे, जिवन घोलप, संजय तांदळे यांनी केली आहे.
What's Your Reaction?