छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या फलकाजवळ लघुशंका करणा-या युवकाने बदनामी मुळे केली आत्महत्या...
छत्रपती संभाजीनगर स्टेशनवर पाटीजवळ लघुशंका करणाऱ्या युवकाने बदनामी मुळे केली आत्महत्या...
व्हायरल व्हिडीओने घेतला युवकाची बळी
जालना, दि.5(डि-24 न्यूज)- छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनचे नामांतर शासनाने केल्यानंतर येथे नव्याने फलक लावण्यात आले आहे. या फलकाजवळ एका युवकाने लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओतील तरुणाने नंतर माफीही मागितली होती. पण, आता या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बदनामी झाल्याने सहन होत नसल्याने या युवकाने आत्महत्या केली अशी माहिती समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वी 2 तरुण छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन इथल्या पिवळ्या बोर्डखाली लघवी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमधील तरुणाचे नाव महेश आढे असे होते. या तरुणाने आता
विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. महेश आढे हा जालन्यातील परतूर तालुक्यातील ठोकमळ तांडा येथील रहिवासी होता.
महेश आढे आणि त्याचा एक मित्र छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या पिवळ्या बोर्डखाली लघवी करत होते. तिथे एका तरुणाने यांचा व्हिडीओ काढला. तेव्हा हे दोन तरुण नशेत असल्याचे कळले. नंतर दुसऱ्या दिवशी या दोघांचा माफीचा एक व्हिडिओ आला. ज्यात त्यांनी झालेल्या कृत्याबद्दल माफी मागितली होती. पण तरीही यांचे व्हिडिओ इंन्स्टाग्रामवर व्हायरल झाले होते.
महेश आढे आणि त्याच्या मित्राला रोज धमकीचे मेसेज आणि फोन येत होते. त्यामुळे महेश आढे या तरुणाने मंगळवारी घरी आणि मित्रांना सांगितलं की, 'मी जीव देईन मला हे सगळं सहन होत नाही'. घरच्या लोकांनी आणि गावकऱ्यांनी त्याची समजूत काढली होती. पण आज बुधवारी गावाच्या जवळ असलेल्या विहिरीत महेश आढे याने विहिरीत उडी मारून जीवन संपवले. ज्यांनी कुणी त्याचे व्हिडिओ व्हायरल केलेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
What's Your Reaction?