जागतिक क्रीडा दिनानिमित्त मनपातर्फे होणार खेळाडूंचा सत्कार

 0
जागतिक क्रीडा दिनानिमित्त मनपातर्फे होणार खेळाडूंचा सत्कार

जागतिक क्रीडा दिनानिमित्त मनपा तर्फे होणार क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंचा सत्कार

औरंगाबाद, दि.21(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने जागतिक क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू व विविध क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे.

      दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी जागतिक क्रीडा दिना निम्मित डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र एन -12 येथे मान्यवरांच्या हस्ते सकाळी 11 वाजता मनपा हद्दीतील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू, माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यमान व माजी क्रीडा संघटक यांचा महानगरपालिके तर्फे सत्कार करण्यात येणार आहे.

       त्या अनुषंगाने सर्व खेळाडू व क्रीडा संघटक यांनी आपली नावे दिनांक 23 ऑगस्ट 2023 बुधवार रोजी पर्यंत महानगरपालिका क्रीडा विभागात कार्यालयीन वेळेत सादर करण्यात यावे. त्यानंतर आलेल्या नावे विचारात घेतली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी असे प्र. क्रीडा अधिकारी संजीव बल्लय्या यांनी कळविले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow