जायकवाडी धरणाच्या जमीनीवर अतिक्रमण काढण्यासाठी मनपा मदत करणार...

 0
जायकवाडी धरणाच्या जमीनीवर अतिक्रमण काढण्यासाठी मनपा मदत करणार...

जायकवाडी धरणाची जमिनीवर अतिक्रमण काढण्यासाठी मनपा मदत करणार...

जेसीबी, यंत्रणा आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देणार...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) - जायकवाडी धरणाची जागेवर झालेले अतिक्रमण काढण्यासंदर्भात आज जिल्हा परिषद जलसंपदा आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची संयुक्त बैठक महानगरपालिका येथे पार पडली.

 सदरील अतिक्रमण काढण्यासाठी महानगरपालिका यंत्रणा पुरवठा करतील असे आश्वासन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांना दिले.

 सदरील कारवाई अंदाजी पुढच्या आठवड्यात पार पाडण्यात येत असून याबाबत प्रशासक जी श्रीकांत यांनी सूचना केल्या.

 ते म्हणाले की एम एस ई बी यांनी वीज पुरवठा चे कनेक्शन कारवाईच्या आधी खंडित करावे तसेच संबंधित विभागाने कारवाईचा आठवड्यापूर्वी भोंगा फिरवून सर्व अतिक्रमणधारकांना स्वतः अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन करावे. या ठिकाणी शाळा पण येत असेल तर ती शाळा इतर ठिकाणी हलवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. सदरील कारवाईसाठी महानगरपालिका जेसीबी, मनुष्यबळ व इतर आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देणार आहे. 

सदरील बैठकीत संबंधित विभागांनी दिलेली माहितीनुसार जायकवाडी उत्तर वसाहतीत तात्पुरत्या स्वरूपाचे (पत्र्याचे) एकूण 350 निवास स्थाने कायमस्वरूपाचे (स्लॅबचे) 90 निवासस्थाने, 110 अनधिकृत वसाहत, एकूण 30 वाणिज्य अतिक्रमणधारक आणि एकूण अतिक्रमित क्षेत्र चाळीस हेक्टर इतके आहे. याशिवाय जायकवाडी दक्षिण वसाहतीत तात्पुरत्या स्वरूपाचे 205 घरे, वाणिज्य अतिक्रमण धारकांची संख्या 40 आहे आणि या ठिकाणी एकूण अतिक्रमित क्षेत्र 16 हेक्टर इतका आहे.

 सदरील सर्व अतिक्रमण काढण्यास महानगरपालिका जिल्हा परिषद आणि जलसंपदा विभागाची यंत्रणा आणि मनुष्यबळ उपलब्ध करून सहायता करणार आहे याचे आश्वासन प्रशासक जी श्रीकांत यांनी आज बैठकीत दिले.

सरील बैठकीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्यासह अशोक शिरसे, प्रकल्प संचालक DRDA,अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहूळे,सहायक आयुक्त सविता सोनवणे,कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी,कार्यकारी अभियंता महावितरण शैलेश कलंत्री,ग्राम पंचायत अधिकारी प्रभाकर पठारे,तंटा मुक्ति अध्यक्ष रामजी मोरे,सरपंच पैठण धनंजय मोरे,गट विकास अधिकारी मनोरमा गायकवाड ,मुख्य अभियंता तथा मुख्य प्रशासक सुनंदा जगताप,आदींची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow