जावेद कुरैशी यांना पितृशोक, उद्या सकाळी दफनविधी
 
                                जावेद कुरैशी यांना पितृशोक, उद्या सकाळी दफनविधी, एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जीवनभर केला संघर्ष...
औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) मुस्लिम इत्तेहाद फ्रंटचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक जावेद कुरैशी यांचे वडील मोहंमद इसाक शेख वजीर कुरेशी, वय 89, रहिवासी फाजलपूरा, एसटी काॅलनी यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले.
मोहंमद इसाक हे 1993 मध्ये एसटी महामंडळाच्या अकाऊंट अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले होते. महाराष्ट्रा एसटी कामगार संघटनेचे सेक्रेटरी म्हणून अनेक वर्षे काम केले. एसटी महामंडळाच्या पतसंस्थेत सहा वर्षे संचालक म्हणून काम केले. एसटी महामंडळात कामगारांना शहरात हाउसिंग सोसायटी निर्माण करुन विविध भागात 300 घरे त्या काळात स्वस्तात घरे बांधून देण्याची किमया त्यांनी केली होती म्हणून त्यांचे एसटी महामंडळाच्या कामगारांमध्ये वेगळेच स्थान होते. एसटी काॅलनी, फाजलपूरा, न्यू एसटी काॅलनी फाजलपूरा, मुकुंदवाडी येथे दोन या ठिकाणी एसटी काॅलनी निवास बनवून वसवले व त्या सोसायटी बनवून आकार दिला.
उद्या सकाळी 9 वाजता शहागंज येथील मस्जिद-ए-कला येथे नमाज -ए-जनाजा अदा केली जाईल. त्यानंतर फाजलपूरा येथील पिर गैब साहेब कब्रस्तानात दफनविधी होईल अशी माहिती त्यांचे जेष्ठ पुत्र जावेद कुरैशी यांनी डि-24 न्यूजला दिली आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            