जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांची बदली पुण्याला, नवीन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पदभार स्वीकारतील...!
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांची पुण्याला बदली, नवीन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
मुंबई, दि.14(डि-24 न्यूज) औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांची बदली अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व अतिरिक्त संचालक, भुमी अभिलेख, पुणे या रिक्त पदावर करण्यात आली आहे. त्यांच्या जागी दिलिप स्वामी हे नवीन जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारतील. असे आदेश आज सामान्य प्रशासनाने नितीन गद्रे यांनी काढले आहे. आस्तिक कुमार पाण्डेय हे चार वर्षांपासून होते. त्यांनी तीन वर्षे मनपा प्रशासक व आयुक्त म्हणून चांगली कामगिरी केली. कोरोना नियंत्रण करण्यासाठी चांगले निर्णय, स्मार्ट सिटीत शहरात विविध विकासकामांचे चांगले निर्णय घेऊन शहर स्मार्ट केले. जी-20 बैठक यशस्वी करण्यासाठी योगदान, कचरा प्रश्न हाताळून कचरा प्रक्रिया केंद्र उभारुन शहर स्वच्छ आणि खाम नदी स्वच्छ व निर्मळ करण्यासाठी नियोजनबद्ध नागरीकांच्या सहयोगाने पुनरुज्जीवन मोहीम यशस्वी केली. रस्ते चकचकीत केले. नेहरु भवन उभारण्यात पुढाकार घेतला. संत एकनाथ रंगमंदिराचे सुशोभिकरण केले. मनपा कर्मचारी भरती असे अनेक निर्णय त्यांनी घेतले. मनपाच्या शाळांचा शिक्षणाचा विस्तार केला. मनपाची आर्थिक परिस्थिती सुधारणा केली. मागिल दिड वर्षांपासून जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी पदभार सांभाळला होता. जिल्ह्यात सुध्दा त्यांची विकासाच्या दृष्टीने उल्लेखनीय काम केले. त्यांच्या विकासकार्य न विसरण्यासारखे आहे म्हणून त्यांची आठवण शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना नेहमी असेल. असे नागरीकांना वाटते.
What's Your Reaction?