जिल्हाधिकारी कार्यालयात रिक्षाचालकांच्या विविध प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक संपन्न...!

 0
जिल्हाधिकारी कार्यालयात रिक्षाचालकांच्या विविध प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक संपन्न...!

जिल्हाधिकारी कार्यालयात रिक्षाचालकांच्या विविध प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक संपन्न...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज)- जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील रिक्षाचालकांच्या विविध प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस आरटीओ अधिकारी, मनपा आयुक्त, वाहतूक शाखेचे अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच विविध रिक्षाचालक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीला भारतीय जनता पार्टी संलग्न जाणता राजा रिक्षा युनियनचे अध्यक्ष किशोर माळी, भागवत दौड, महासंघाचे अध्यक्ष निसार अहमद खान, राजू पगारे तसेच विविध रिक्षाचालक संघटनांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित राहून रिक्षाचालकांच्या न्याय्य व प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.

बैठकीत रिक्षाचालकांच्या समस्या, वाहतूक व्यवस्थेतील अडचणी, रिक्षा स्टँड, परवाने व इतर महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. संबंधित मागण्यांवर लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन कार्यवाही करण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow