जिल्हा श्री गणेश महासंघाच्या खो-खो स्पर्धेने आणली रंगत...

जिल्हा श्री गणेश महासंघाच्या खो-खो स्पर्धेने आणली रंगत...
भर पावसात खेळाडूंनी वाढवला गणेश भक्तांचा उत्साह
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) - जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समिती व छत्रपती संभाजी नगर जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 17 वर्षाखालील मुला-मुलींची भव्य खो खो स्पर्धा जिल्हा परिषदेच्या मैदानावर बुधवारी घेण्यात आली. या स्पर्धेचे उदघाटन माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत निल्लावार, खो-खो असोसिएशनचे जिल्हा सचिव विकास सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. या खो-खो स्पर्धेत तब्बल सहाशेहुन अधिक शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनीनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी मनपा वॉर्ड अधिकारी रमेश मोरे, माजी नगरसेवक, ज्ञानेश्वर जाधव, पत्रकार विजय देऊळगावकर, युवा उद्योजक निखिल मित्तल, अभिषेक कादी यांनी स्पर्धा प्रसंगी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या खो-खो स्पर्धेसाठी पंच म्हणून श्रीपाद लोहकरे, दीपक सपकाळ, राहुल नाईक नवरे, वरद कचरे, योगेश भोगे, सुरत चिरमाडे, नील जावळे, यश पाखरे, यश मोरे, तात्याराव म्हस्के, भीम सोनटक्के, शुभम सुरळे, उमेश साबळे, कृष्णा पंडुरे, अंकुश गायकवाड यांनी काम पाहिले. तर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी श्री गणेश महासंघाचे कार्याध्यक्ष विक्की जाधव, शिवा ठाकरे, हरीश शिंदे, फैजान शेख, अजय कागडा, संजय दुरबे, वैभव ठाकरे, प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे, यांनी पुढाकार घेतला.
यांनी नोंदविला सहभाग...
खो-खो स्पर्धेत सरस्वती भुवन प्रशाला छत्रपती संभाजीनगर, गंगापूर येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळा, खोडेगाव येथील जिल्हा परिषद शाळा, आ. कृ. वाघमारे शाळा, शासकीय विद्यानिकेतन, वेरूळ येथील कलावती चव्हाण आश्रम शाळा, वडोद बाजार येथील स. भु. प्रशाला, कांचनवाडी येथील राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा, वेरूळ येथील कलावती चव्हाण आश्रम शाळा, देवळाली येथील स्वामी समर्थ मंदिर, मनोर येथील जिल्हा परिषद प्रशाला, गदाना येथील न्यू हायस्कूल, लासुर स्टेशन येथील न्यू हायस्कूल तर मुलींच्या संघामध्ये. कृ. वाघमारे प्रशाला, वडोद बाजार येथील सभा प्रशाला, गंगापूर येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळा, मनुर येथील जिल्हा परिषद प्रशाला, वडोद बाजार येथील स. भु. प्रशाला, गदाना येथील न्यू हायस्कूल, यांनी आपला सहभाग नोंदविला.
What's Your Reaction?






