जिल्ह्यात एकाच वेळी आरोग्य समुपदेशन कार्यशाळा यशस्वी...

 0
जिल्ह्यात एकाच वेळी आरोग्य समुपदेशन कार्यशाळा यशस्वी...

जिल्ह्यात एकाच वेळी “आरोग्य समुपदेशन कार्यशाळा" यशस्वी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या सानिध्यात, विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य संवर्धनासाठी दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.00 ते 11.00 या वेळेत मनपा हद्दीतील सर्व शाळांमध्ये एकाच वेळी “आरोग्य समुपदेशन कार्यशाळा” यशस्वीपणे आयोजित करण्यात आली.

या उपक्रमांतर्गत मनपा हद्दीतील 228 तसेच महानगरपालिकेच्या 32 शाळांमध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आले होते. नारेगाव मनपा शाळेत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा व सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भामरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती काजवे, तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

कार्यशाळेमध्ये संतुलित आहार, जंक फ़ूड चे दुष्परिणाम, वैयक्तिक स्वच्छता, मोबाईल व स्क्रीन टाइम मर्यादा, मानसिक आरोग्य, किशोरवयीन समस्या व व्यसनाधिनतेचे दुष्परिणाम, सिकलसेल अॅनिमिया, क्षयरोग मुक्तभारत याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तर व समुपदेशन सत्रांमधून विद्यार्थ्यांच्या शंका समाधान करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करून त्यांना सक्षम व जबाबदार नागरिक घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. सर्व आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow