डॉ.शोएब हाश्मी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या विविध समाजोपयोगी उपक्रम
डॉ.शोएब हाश्मी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या विविध समाजोपयोगी उपक्रम
युवासेना प्रमुख, आमदार आदीत्य ठाकरे शुभेच्छा देण्यासाठी येणार....
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.3(डि-24 न्यूज)
उद्या शिवसेनेचे जिल्हा संघटक तथा एशियन हाॅस्पिटलचे संचालक डॉ शोएब हाश्मी यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती अभिष्टचिंतन सोहळा समितीने डि-24 न्यूजला दिली आहे.
डॉ.शोएब हाश्मी हे उद्या 4 सप्टेंबर रोजी शुभेच्छा स्विकारण्यासाठी दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत जालना रोड येथील एशियन हाॅस्पिटलमध्ये उपस्थित राहणार आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सकाळी 10 वाजता रक्तदान शिबीर, 11 वाजता रुग्णांना अन्नदान, दुपारी 12 वाजता भगवानबाबा बालिका आश्रम वृध्दाश्रम येथे अन्नदान, दुपारी गरजूंना रेशन वाटप, सायंकाळी 5 वाजता बैतूल यतीम येथे रेशन वाटप करण्यात येणार आहे.
काल शिवसेनेने युवासेना प्रमुख, आमदार आदीत्य ठाकरे यांचा दौरा असल्याने ते शुभेच्छा देण्यासाठी येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
What's Your Reaction?