तर रशीद मामू महापौर अथवा एमआयएमला संधी...? उद्याच्या सोडतीकडे सर्वांचे लक्ष, राजकीय भुकंपाची शक्यता...
तर एमआयएम व रशीद मामू यांना महापौर बनण्याची संधी...1997 मध्ये मामूंना लागली होती लाॅटरी...!
उद्या होणा-या महापौर पदाच्या सोडतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) - उध्दव सेनेची उमेदवारी मिळाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूकीत 84 वय असलेले माजी महापौर रशीद खान मामू चर्चेत आले होते. भाजपा व शिवसेनेच्या नेत्यांनी टिका करत राजकारण तापले होते. प्रभाग क्रमांक 4 मधून एसटी पुरुष आरक्षित जागेतून अटीतटीच्या लढतीत मामूंनी बाजी मारली आता उद्या महापौर पदाची सोडत होणार आहे. महापौर पद एसटी पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित झाले तर उध्दव सेनेची पुन्हा लाॅटरी लागण्याची शक्यता आहे. 1997 मध्ये हे आरक्षण एसटी पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर रशीद खान मामू यांना महापौर पद मिळवण्यासाठी न्यायालयात दाद मागितली होती. ते शहराचे पहिले मुस्लिम महापौर बनले होते. एक वर्ष या पदावर त्यांनी काम करत महत्वाचे निर्णय घेतले होते. एसटी प्रवर्गासाठी महापौर पदाला 29 वर्षे लोटली आता यंदा फिरुन हे पद आरक्षित झाले तर भाजपाचे महापौर पदाचे स्वप्न भंगेल आणि उध्दव सेनेकडे पुन्हा हि संधी येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एसटी महीला प्रवर्गासाठी महापौर पद आरक्षित झाले तर एमआयएमला पहील्यांदाच महापौर पदाची लाॅटरी लागू शकते. प्रभाग क्रमांक 1 मधून विजयश्री जाधव या एमआयएमच्या तिकीटावर निवडून आले आहे. एसटी महीला असो किंवा पुरुष आरक्षित झाले तर मुस्लिम महापौर बनण्याची संधी आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एसटी प्रवर्गासाठी महापौर पद आरक्षित झाले तर राजकीय समीकरण बदलतील असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
What's Your Reaction?