ताईक्वांदोत पदकांची कमाई करणा-या खेळाडूंना केले सन्मानित

ताईक्वांदोत पदकांची कमाई करणा-या खेळाडूंचा केले सन्मानित
बिडकीन, दि.9(डि-24 न्यूज) येथील चिमुकले खेळाडूंना इंटरनॅशनल कोच हाफीज इम्रान शेख यांनी तयार केलेल्या बिडकिनच्या पाच खेळाडूंनी दिल्ली येथे झालेल्या तायक्वांदो आंतरराष्ट्रीय चॅम्पियन स्पर्धेत पाच पदकाची कमाई करत चिमुकल्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले. देशासाठी पदके जिंकली हि या जिल्हा व गावासाठी गर्वाची गोष्ट आहे. भविष्यात हे खेळाडू ऑलिंपिक स्पर्धेत देशासाठी पदके मिळवून देतील असा विश्वास या खेळाडूंसाठी सन्मान कार्यक्रमात बिडकीनचे पोलिस उपनिरीक्षक निलेश शेळके यांनी गौरवोद्गार काढले.
गोल्ड मेडल प्राप्त करणारे हुमायून हाफिज इम्रान, कास्य पदक सार्थक कृष्णा राठोड, ब्राॅन्झ उबेद अफरोज पठाण, केशव देविदास वैष्णव, सौरभ संजय परमेश्वर यांचा प्रमाणपत्र व हार घालून सन्मानित करण्यात आले. काही खेळाडूंना येल्लो बेल्ट व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी नगरसेवक सय्यद असलम, फिरदौस पठाण, हुसेन पटेल, हाफिज अबुजर पटेल, रियाज सौदागर, पत्रकार मुबीन पठाण, शेख अमजद, अब्दुल जलिल मिर्झा, सालार पठाण, मौलाना सुलेमान उपस्थित होते. कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय कोच हाफिज इम्रान यांचाही सत्कार करण्यात आला.
What's Your Reaction?






