त्या वक्तव्यावर रावसाहेब दानवे यांनी मागितली क्षमा, म्हणाले पुन्हा महायुती सरकार सत्तेवर येणार
त्या वक्तव्यावर रावसाहेब दानवे यांनी मागितली क्षमा, म्हणाले पुन्हा महायुती सरकार सत्तेवर येणार
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), मी शिवाजी व अब्दुल सत्तार औरंगजेब या वक्तव्यावर भाजपाचे विधानसभा निवडणुक प्रमुख रावसाहेब दानवे यांनी क्षमा मागितली. आज शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या वक्तव्यावर खुलासा केला. त्यांनी सांगितले मी शिवाजी म्हटलो होतो छत्रपती शिवाजी महाराज नाही. वक्तव्याचा विपर्यास केला गेला म्हणून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागतो. सिल्लोडला प्रचारासाठी जाणार का याबद्दल ते म्हणाले पक्ष ज्या ठिकाणी पाठवेल तेथे मला जावे लागेल. महाराष्ट्रात माझ्या जाहीर सभा आहेत. अडीच वर्षांच्या आमच्या महायुतीच्या सरकारने जनहिताचे निर्णय घेतले. युवा, शेतकरी, महीला व विविध घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे महीलांना आर्थिक पाठबळ मिळाले. उध्दव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने भ्रष्टाचार, विकासाला विरोध, समस्याग्रस्त शेतकऱ्यांची उपेक्षा, दुर्बल घटकांकडे दुर्लक्ष, केवळ कुटुंब व परिवाराचे भले करण्यासाठी राज्याला वेठीस धरणाऱ्या मविआ सरकारमुळे महाराष्ट्राची सातत्याने पिछेहाट झाली. येत्या काळात मविआच्या नाकर्त्या कारभाराचा पंचनामा करण्यात येणार असून राज्याचे अतोनात नुकसान करणा-या या स्वार्थी आघाडीस सत्तेपासून दूर ठेवण्याच्या जनतेच्या निर्धारास बळ देण्याकरिता भाजपाने आरोपपत्रांची मालिका सुरू आहे. असे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील म्हणाले.
स्वतःचे कोणतेच कर्तुत्व नसणारे, निवडणूक देखील लढवू न शकणारे, ऐतखाऊ, पित्याच्या पुण्याईवर जगणारे उध्दव ठाकरे आपण आग्रह केल्यामुळे मुख्यमंत्री झाले असा थेट आरोप शरद पवार यांनी केला होता. उध्दव ठाकरे यांनीही बाळासाहेबांचा पुत्र नसतो तर मला काडिचीही किंमत नाही असे सांगून कबुलीच दिली होती. 2019 साली मुख्यमंत्री पदासाठी शिवसैनिकांऐवजी स्वतः मुख्यमंत्री झाले होते. सुदैवाने त्यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्ट आघाडीचा सत्ताकाळ अडीच वर्षातच आटोपला. अन्यथा महाराष्ट्र लयास गेला असता असा आरोप पत्रकार परिषदेत दानवेंनी लावला. ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना अनेक विकासाची प्रकल्प बंद केले. सत्ताकाळात राज्याच्या हाताचे एखादे तरी दखल घेण्याजोगे काम केल्याचे मविआने दाखवून द्यावे. असे आव्हान दानवेंनी दिले. मुस्लिम लांगूलचालनासाठी वक्फ बोर्ड कायद्याच्या विरोधात दंड थोपटले. ठाकरे राज्यातील जनतेशी कसे प्रमाणिक राहणार असा सवालही त्यांनी केला.
यावेळी राज्यसभेचे सदस्य डॉ.भागवत कराड, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, अल्पसंख्याक विभागाचे नेते हाजी एजाज देशमुख, प्रमोद राठोड, हर्षवर्धन कराड, जालिंदर शेंडगे उपस्थित होते.
What's Your Reaction?