दुष्काळ जाहीर करण्याची मनसेची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन...

 0
दुष्काळ जाहीर करण्याची मनसेची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन...

जिल्ह्यासह संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रात तात्काळ दुष्काळ जाहीर करणे, सर्व शेतकऱ्यांना भरीव मदत व कर्जमाफी देण्याबाबत...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज)- सध्या संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रात, विशेषतः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अत्यंत गंभीर व चिंताजनक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे हाताशी आलेली पिके पूर्णपणे करपून गेली असून, पिण्याच्या पाण्याची आणि चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.

शासनाने पहिल्या टप्प्यात काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असला, तरी वस्तुस्थिती पाहता जिल्ह्यातील उर्वरित अनेक तालुके व महसूल मंडळात भीषण परिस्थिती असतानाही ते दुष्काळ जाहीर होण्यापासून वंचित राहिले आहेत. गतवर्षीही ओल्या दुष्काळाच्या काळात शासनाने मोठ्या घोषणा केल्या, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती कोणतीही भरीव मदत किंवा पीक विमा पोहोचला नाही. त्यामुळे शासन दुष्काळाबाबत गंभीर नाही, असाच रोष बळीराजाच्या मनात निर्माण झाला आहे.

सध्याच्या भीषण परिस्थितीत शेतकरी पूर्णपणे कोलमडला असून, त्याला तात्काळ दिलासा मिळणे गरजेचे आहे. यास्तव महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आम्ही आपणाकडे खालील प्रमुख मागण्या करत आहोत:

प्रमुख मागण्या:

 संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तालुके व महसूल मंडळात तात्काळ पूर्ण दुष्काळ जाहीर करण्यात यावा.

तात्काळ भरीव आर्थिक मदत: बाधित शेतकऱ्यांना कोणत्याही जाचक अटी व शर्ती न लावता हेक्टरी भरीव आर्थिक मदत थेट खात्यावर जमा करण्यात यावी.

संपूर्ण कर्जमाफी: चालूबाकीदार व थकबाकीदार असा कोणताही भेद न करता सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी.

पीक विमा भरपाई: सर्व बाधित शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई तात्काळ व विनाअट मंजूर करून तिचे वितरण करण्यात यावे.

दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी: ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे टँकर, जनावरांसाठी छावण्या/चारा डेपो आणि रोहयो (EGS) अंतर्गत कामांची तात्काळ सुरुवात करण्यात यावी.

शेतकऱ्यांची वीज व वसुली स्थगिती: दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतीची वीज जोडणी खंडित करणे थांबवावे व सर्व प्रकारची महसूल वसुली तात्काळ स्थगित करावी.

जर शासनाने व प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रोज एका तालुक्यात तहसील कार्यालयावर घंटा बजाव, ढोल बजाव, डफड बजाव, हालगी बजाव व शिट्टी बजाव तसेच शंखनाद करून झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभं करेल आणि जोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी असे जिल्हा संघटक अशोक पवार पाटील यांनी निवेदनात कळविले आहे.

आपल्या सकारात्मक निर्णयाच्या व तात्काळ कारवाईच्या अपेक्षेत.

अशोक पवार पाटील

 जिल्हा संघटक

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

रस्ते, साधन-सुविधा

व आस्थापना छत्रपती संभाजीनगर, 

अशोक कराळे पाटील

उपजिल्हा संघटक

महाराष्ट्र नवनिर्माण सेना 

रस्ते, साधन-सुविधा

व आस्थापना

बाळासाहेब बोजवारे पाटील 

गंगापूर तालुका सचिव

महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा

 व आस्थापना,

मौलाना गफूर पटेल गंगापूर उपतालुका संघटक,

भागीनाथ मालोदे पाटील

सहसचिव संघटक फुलंब्री तालुका,

विठ्ठल बनकर

जिल्हा परिषद सर्कल संघटक फुलंब्री,

राजू बनकर

ग्राम संघटक लेहा जहांगीर,

मुकेश मालोदे पाटील

रत्नपूर (खुलताबाद)

तालुका सहसचिव

लहु गायकवाड

ग्राम संघटक म्हैसमाळ

कडूबा सोनवणे ग्राम संघटक टाकळी राजेराय,

जालिंदर गायकवाड

महाराष्ट्र सैनिक

रत्नपूर(खुलताबाद),

ओम जित्ते

महाराष्ट्र सैनिक

रत्नपूर (खुलताबाद) यांची निवेदनावर सही आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow