दौलताबाद प्रकरणात काँग्रेस नेत्यांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट
दौलताबाद प्रकरणात काँग्रेस नेत्यांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.20(डि-24 न्यूज) ईद उल अजहा(बकरी ईद) च्या दिवशी दौलताबाद येथे दोन गटात हाणामारी झाली होती. या घटनेत एका गटातील तीन ते चार लोक जखमी झाले होते. दोन्ही गटातील एक दुस-यांविरोधात या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे परंतु एकाच गटातील 13 जणांना अटक करण्यात आली असल्याने काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त संदीप पाटील यांची भेट घेऊन दोषींवर कारवाई करा परंतु एकतर्फी कारवाई करु नका कोणावर अन्याय होईल जे या घटनेत नव्हते त्यांना अटक करु नका अशी विनंती यावेळी काँग्रेसने केली आहे. पोलीस आयुक्तांनी आश्वासन दिले जे दोषी असेल त्यांच्यावरच कारवाई केली जाईल.
याप्रसंगी पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, प्रवक्ते मसरुर खान, अनिस पटेल, मोईन इनामदार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?