नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अडवल्याने गेवराई येथील शेतकऱ्याचे पिके पाण्यात...

नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अडवल्याने गेवराई येथील शेतकऱ्याचे पिके पाण्यात...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.24(डि-24 न्यूज) - गेवराई (ब्रुक बॉण्ड) येथील कंपनी मालकाने नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अडवल्याने नाल्याचे पाणी शेतात शिरून बाबासाहेब जाधव या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे शेतातच पिके सडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेवराई गट नंबर 52 येथील बाबासाहेब जाधव यांच्या शेतात जवळूनच नाला वाहतो शेतातच जाधव यांचे घरही आहे. कंपनी मालकाने वाहणाऱ्या नाल्याला भिंत बांधून नाल्याचा प्रवाह अडवला त्यामुळे नाल्यातील पाणी शेतातच तुंबले शिवाय डोंगरातून वाहणारे पावसाचे पाणीही नाल्याला मिळत आहे. त्यामुळे शेतातील तूर, मका, शेवग्याची पिके सडून उध्वस्त झाले आहे तिथेच उध्वस्त झाल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. या संदर्भात जाधव यांनी तहसीलदार कार्यालय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. आर्थिक नुकसान भरपाईची मागणी ही केली परंतु प्रशासनाने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. जो शिव रस्ता होता तोही गायब झाला आहे. परिणामी जाधव यांना नाल्यातील पाण्यातूनच ये जा करावी लागते प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि अडवलेल्या नाल्याचा प्रवाह पूर्ववत सुरू करावा. शेतमालाचे झालेले नुकसान भरून द्यावे अशी मागणी श्री जाधव यांनी प्रशासनाकडे केली आहे.
What's Your Reaction?






