नितेश राणे यांच्यावर एमपिडिए व एनएसए अंतर्गत कारवाई करण्याची एसडिपिआयची मागणी
नितेश राणे यांच्यावर एमपिडिए व एनएसए अंतर्गत कारवाई करण्याची एसडिपिआयची मागणी
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.3(डि-24 न्यूज) अहमदनगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल कथित वक्तव्य केले आहे यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होत आहे. नेहमी ते मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जातील असे जाणूनबुजून वक्तव्य करत आहे. विविध पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहमी ते बेताल वक्तव्य करुन राज्याची कायदा व सुव्यवस्था खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिस महासंचालक यांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व एमपिडिए व एनएसए अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देऊन एसडिपिआय(सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया) च्या वतीने करण्यात आली आहे. इंग्रजीमध्ये तीन पानांचे निवेदन आज दुपारी देण्यात आले यामध्ये त्यांनी हि मागणी केली आहे.
यावेळी महाराष्ट्र कोषाध्यक्ष युसुफ पटेल, जिल्हाध्यक्ष साकी अहमद, जिल्हा उपाध्यक्ष जब्बार खान, जिल्हा महासचिव नदीम शेख, जिल्हा सचिव डॉ.सईद, कोषाध्यक्ष अबुजर पटेल, मोहसीन खान, अजिम शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?