निदा खानला लपवणा-या एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर गुन्हा दाखल...
निदा खानला लपवणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर गुन्हा दाखल...
फरार निदा खानला नारेगावातून पोलिसांनी केली अटक...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज)- नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मातर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथून गुरुवार, 8 मे रोजी सायंकाळी ताब्यात घेण्यात आले. नाशिक पोलिसांच्या पथकाने संभाजीनगर येथील गुन्हे शाखेच्या मदतीने ही संयुक्त कारवाई केली. दरम्यान, निदा खानला नारेगाव परिसरात लपण्यास मदत केल्याप्रकरणी एमआयएम पक्षाचे नारेगाव प्रभागाचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
तब्बल महिनाभर पोलिसांना हुलकावणी देणारी निदा अखेर पोलिसांच्या तावडीत सापडली. तिने छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव येथील एका वसाहतीत कुटुंबासह आश्रय घेतला होता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नाशिक पोलिसांनी तिचा ठावठिकाणा शोधला होता. 3 ते 4 दिवसांपासून पोलिस तिच्या मागावर होते. गुरुवारी पहाटेच तिला ताब्यात घेण्यासाठी सापळा रचण्यात आला होता; परंतु काही कारणाने ऐनवेळी त्यात बदल केला गेला. साध्या वेशातील जवळपास 20 हून अधिक पोलिस निदा खान ज्या भागात वास्तव्यास होती तेथे लक्ष ठेवून होते. यात महिला पोलिसांचाही समावेश होता. निदा खानला ताब्यात घेतल्यानंतर नाशिक पोलिसांनी तिला न्यायाधीशांसमोर हजर केले. 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर नाशिक पोलिसांचे पथक निदा खानला घेऊन गुरुवारी रात्रीच नाशिककडे रवाना झाले.
दरम्यान, निदा खान हिला नारेगाव परिसरात एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल यांनी आश्रय दिल्याचे उघड झाले असून त्यांच्यावर नाशिक पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेशाखा पोलिसांनी शुक्रवार, 8 मे रोजी एमआयएम पक्षाचे माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची देखील चौकशी केली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यामुळे निदा खान छत्रपती संभाजीनगर शहरात ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात होती त्यांचे धाबे दणाणले आहेत.
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणी नीदा खानला एमआयएमने आश्रय दिला. इम्तियाज जलिल यांचीही याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. इम्तियाज जलिल यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले एखाद्या व्यक्तीवर जेव्हा आरोप करण्यात येतो तेव्हा कोर्ट त्याला दोषी ठरवत नाही तोपर्यंत निष्पाप असतो. इनोसंट, अनटिल प्रुव्हन गिल्टी हे न्यायव्यवस्थेचे तत्व आहे. त्यामुळे एखाद्यावर आरोप झाले म्हणजे दोषी ठरत नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तोपर्यंत त्या मुलीला अधिकार आहे की ती जामिनाची मागणी करु शकते. हि कायदेशीर तरतूद आहे. सत्र न्यायालयाने तिला अटकपूर्व जामीन नाकारला म्हणून ती लगेच गुन्हेगार ठरत नाही. तिला उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याचा पर्याय आहे.
What's Your Reaction?