निवडणूकीवर रेशन दुकानदारांचा बहीष्कार...?
निवडणूकीवर रेशन दुकानदारांचा बहीष्कार...?
ऑक्टोबर 2023 ते मार्च 2024 पर्यंतचा कमिशन मिळाले नाही असल्याची दिली माहिती....
औरंगाबाद, दि.25(डि-24 न्यूज) जिल्ह्यातील 1813 रेशन दुकानदारांचे सहा महीन्यांचे कमिशन थकल्याने रास्त भाव दुकानदारांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अनेकदा निवेदने दिली आंदोलन केले तरीही मागणी पूर्ण झाली नाही. आठ दिवसांत मार्जिनची संपूर्ण रक्कम मिळाली नाही तर नाईलाजाने 13 मे 2024 रोजी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदानावर बहीष्कार टाकणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाचे राज्याध्यक्ष डि.एन.पाटील यांनी इशारा दिला आहे.
आज रेशन दुकानदारांना नवीन ई-पोझ 4G मशिन वाटप हि वाटण्यास त्यांनी विरोध केला. अगोदर प्रशासनाने नवीन मशिन चालवण्यासाठी अधिका-यांनी कार्यशाळा घ्यावी. लाभार्थ्यांना ताटकळत न ठेवता एकदाच अंगठ्यावर अन्नधान्य, शिधा वाटप, साडी वाटप करायची असल्यास वेळ वाया जाणार नाही असे साॅफ्टवेअर मशिन मध्ये टाकण्यात यावे अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकारी यांची आज भेट झाली नाही त्यांची भेट झाल्यावर मागणीचे निवेदन त्यांना सादर केले जाणार आहे अशी माहिती यावेळी माध्यमांना डि.एन.पाटील यांनी दिली आहे. कमिशन दरमहीने नियमित देण्याचे नियोजन प्रशासनाने करावे. प्रलंबित कमिशन मिळाले नाही तर मतदान प्रक्रीयेवर मतदान न करता बहीष्कार टाकण्याचा निर्णय जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारांच्या विचाराधीन आहे. तरी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रकरणाची दखल घेऊन जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारांच्या न्याय हक्क मागण्यांवर शाघ्रगतीने सकारात्मक समाधान उपलब्ध व्हावे अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी डी.एन.पाटील, चंद्रकांत यादव, राजेश अंबुसकर, सचिन दुशडे, मधुकर चव्हाण, सचिन करोडे, गंगाधर पवार, पुंडलिक अंभोरे, संजय साळवे, काकासाहेब पळसकर, दगडू बेग आदी उपस्थित हो
ते.
What's Your Reaction?