पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्यासाठी वंचितचे मुंबईत धरणे आंदोलन - अॅड बाळासाहेब आंबेडकर
पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबईमध्ये धरणे आंदोलन - ॲड. बाळासाहेब आंबेडकर
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज)- व्यापार करारानुसार अमेरिकेतून आयातीवर टेरिफ नाही, मात्र भारतातून अमेरिकेत निर्यातीवर 18 टक्के टेरिफ हा विशेष कर लागू होणार आहे. विदेशी व्यापार धोरणांमुळे देश गहाण पडल्यासारखी स्थिती आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव ‘एपस्टीन फाइल’मध्ये आहे. जेफ्री एपस्टीनच्या सांगण्यावरुन मोदी काही देशांच्या राष्ट्राध्यक्षांसमोर नाचल्याचा उल्लेख आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सोमवारी, 2 मार्च 2026 रोजी मुंबईत वंचित बहुजन आघाडी धरणे धरणार आहे, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यांनी आंदोलनात काँग्रेससह विविध धर्मनिरपेक्ष पक्षांनी सोबत येवून सहभागी होण्याचे यावेळी आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यापार धोरण आणि ‘एपस्टीन फाइल’मधील उल्लेखावर वंचित बहुजन आघाडी आंदोलन करणार आहे. मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे. मोदींनी या आरोपावर स्पष्टीकरण देशाला द्यावे. ‘वंचित’चे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर टीका करीत व्यापार करार उलगडला. ‘राफेल खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. इंडोनेशियाने फ्रान्सकडून ज्या किमतीत राफेल खरेदी केली त्यापेक्षा अधिक किमतीने भारताने खरेदी केली. काही महिन्यांत भारताने केलेल्या विदेश करारात ‘एपस्टीन फाइल’ची झलक दिसत आहे. कारण पंतप्रधान मोदी यांचे नाव फाइलमध्ये आहे. मोदी यांनी इतर राष्ट्राध्यक्षांसमोर नाच केल्याचा वाईट उल्लेख त्यात आहे. अल्पवयीन मुलींशी गैरव्यवहार आणि नरभक्ष्यी लोकांचा सहभाग असल्यामुळे एपस्टीन प्रकरण जगभर गाजत आहे. जगातील दोन लाख मुले गायब झाली याचे उत्तर मिळत नाही हि मुले कोठे गेली याचाही छडा लागला पाहिजे. रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करुन तेच तेल विकून उद्योजक 40 हजार कोटी रुपये कमावतात. ही तेल खरेदी भारताने बंद केली आहे. त्यामागे युक्रेन-रशिया युद्धाची पार्श्वभूमी आहे. या निर्णयाला अमेरिकेशी केलेला व्यापार करार कारणीभूत आहे का याचा खुलासा सरकारने करावा, असे आंबेडकर म्हणाले.
रमजान महिन्यानंतर अमेरिका इराणवर हल्ला करण्याची शक्यता आहे. भारत इराणची साथ सोडणार की त्यांच्यासोबत राहणार यावरही सरकारने स्पष्टीकरण द्यावे. विदेश धोरणावरही शंका उपस्थित होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वत:ला देशभक्त म्हणतात. मोदी देश विकत असताना आणि राष्ट्राची एकता गहाण टाकत असताना तुमची भूमिका काय आहे यावर संघाने बोलावे, अशी टीका आंबेडकर यांनी केली. मुंबईतील आंदोलनात इतर राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या पत्रकार परिषदेला नगरसेवक अमित भुईगळ, मनपाचे गटनेते अफसर खान, जावेद कुरेशी, नगरसेविका करुणा जाधव, जिल्हा निरीक्षक योगेश बन, जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, रूपचंद गाडेकर, शहराध्यक्ष ॲड. पंकज बनसोडे, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, राहुल मकासरे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भाऊराव गवई, मेघानंद जाधव, शुभम मगरे, भीमराव गाडेकर, अक्रम खान, रवि रत्नपारखे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?