पडेगावात दुस-या दिवशी 272 अतिक्रमणे भुईसपाट, पहा ड्रोनने घेतलेली छायाचित्रे
 
                                 
मनपा हद्द शरनापूर फाटा ते पडेगाव दरम्यान 272 मालमत्ता पाडली...
पडेगाव येथील अतिक्रमण कार्यवाहीची ड्रोनने घेतलेली छायाचित्रे...
दोन दिवस विश्रांती, सोमवारी सिडको बस स्टॅन्ड ते हर्सूल टी पॉईंट पर्यंत कारवाई...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)-
शहरात सुरू असलेली अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत आज शरणापूर फाटा ते पडेगाव दरम्यान एकूण 272 अतिक्रमण, अनधिकृत मालमत्ता निष्कासित करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार आणि नियंत्रण अधिकारी, अतिक्रमण विभाग संतोष वाहुळे यांच्या उपस्थितीत मनपा हद्द शरणापूर फाटा ते पडेगाव दरम्यान केलेल्या कारवाईत एकूण 272 एवढी पक्की आणि कच्ची बांधकामे ज्यामध्ये हॅाटेल, लॅाज, दुकाने, शेड,कंपाऊंड,ओटे,गॅरेज,वॅाशिंग सेंटर,कमान,जाहिरात फलक, इ. निष्कासित करण्यात आले आहेत.
सदर कारवाई मध्ये महानगरपालिकेच्या 350 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तर पोलीस विभागाचे 250 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या कारवाईसाठी 25 जेसीबी, 5 पोकलॅन, 15 टिप्पर, 2 रूग्णवाहिका, 2 कोंडवाडा वाहने, 2 अग्निशमन बंब, 5 इलेक्ट्रिक हायड्रॅालीक वाहने इ. वाहनांचा समावेश होता.
सदरील कारवाईत मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, कार्यकारी अभियंता (यांञिकी) अमोल कुलकर्णी, सहायक पोलीस आयुक्त रणजीत पाटील, अतिक्रमण उपायुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त अर्जून गिराम, प्राजक्ता वंजारी, अर्चना राजपूत, रमेश मोरे, संजय सुरडकर, अशोक गिरी, समीउल्लाह, भारत बिरारे, राहूल जाधव, नईम अन्सारी, इमारत निरीक्षक कुणाल भोसले,शिवम घोडके,सागर श्रेष्ठ, तृप्ती जाधव,सय्यद जमशेद, सय्यद मजहर अली, नगररचना विभागाचे सौरभ साळवे, सूरज संवडकर,राहूल,शिवाजी लोखंडे व नागरी मित्र पथकाचे प्रमोद जाधव हे कर्मचारी उपस्थित होते.
सोमवार पासून पुनः कारवाई...
शनिवार आणि रविवार या दोन दिवसांची विश्रांती नंतर सोमवारपासून पुन्हा कारवाईची सुरुवात सुरुवात होणार आहे सोमवारी सिडको बस स्टॅन्ड ते हर्सूल टी पॉइंट आणि हर्सूल टी पॉइंट ते दिल्ली गेट या मार्गावर कारवाई होणार आहे या मार्गावर नागरिकांनी स्वतः अतिक्रमण काढून महापालिकेशी सहकार्य करावे असे आवाहन जी श्रीकांत यांनी यावेळी केले.
बाबूलाल गंगाधर महापुरे यांच्या प्रशासकांचे हस्ते सत्कार...
शरणापुर फाटा ते पडेगाव या मार्गावर अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू असताना आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी आज या मार्गावर स्थळ पाहणी केली. पडेगाव या ठिकाणी त्यांना अवगत करण्यात आले की बाबूलाल महापुरे यांच्या घर सुद्धा अतिक्रमण कारवाईत निष्कासित करण्यात आला आहे. तरी देखील त्यांनी कारवाईला विरोध न करता उलट सहकार्य केलं आणि यापुढे कोणीही विनापरवानगी घर किंवा कोणताही बांधकाम करू नये असे संदेश नागरिकांना दिले. या भावनेचे कौतुक करून जी श्रीकांत यांनी त्यांच्या जागेवर शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            