पदमपुरा भागातील 19 वर्षीय तरुणी बेपत्ता, माहिती कळविण्याचे आवाहन...
पदमपुरा भागातील 19 वर्षीय तरुणी बेपत्ता; माहिती कळविण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज):येथील नवीनवस्ती, काकाचौक, पद्मपुरा भागात राहणारी 19 वर्षीय युवती घरातून कॉलेजला जाते असे सांगून निघून गेली असून ती अद्याप घरी परतलेली नाही. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता (मिसिंग) असल्याची नोंद करण्यात आली आहे.
तक्रारदार विनोद शंकर देवरे यांनी 5 जून रोजी वेदांतनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी अक्षदा विनोद देवरे (वय 19 वर्ष, व्यवसाय- शिक्षण)ही घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेली आहे. नातेवाईक आणि परिचित ठिकाणी शोध घेतला असता ती मिळून आली नाही.
बेपत्ता तरुणीचे वय 19 वर्षे, उंची: 5 फूट 5 इंच
रंग:काळा-सावळा
नाक सरळ व डोळे काळे, केस लांब आणि काळे असून
शर्ट आणि सलवार , पायात गुलाबी रंगाची सँडल. घातलेली असून या वर्णनाची युवती कोणास आढळून आल्यास किंवा तिच्याबाबत काही माहिती मिळाल्यास तातडीने वेदांतनगर पोलीस स्टेशन,फोन नं. 0240-2351333 येथे किंवा पोलीस हवालदार पी.एस. शिरसाठ यांच्याशी 9850450167 संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
What's Your Reaction?