पल्स पोलिओ लसीकरण शहरात 80 टक्के उद्दीष्ट पूर्ण
पल्स पोलिओ सरासरी 80% उद्दिष्ट पूर्ण...
औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) आज दिनांक 3 मार्च रोजी पोलिओ रविवार असून शहरातील महानगरपालिकेतर्फे पल्स पोलिओ मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.
सदरील मोहिमेत सरासरी 80% मुलांना पोलिओ लस देण्यात आले.
मनपा कार्यक्षेत्रात शून्य ते पाच या वयोगटातील 1,98910 मुलांना पोलिओ डोस पाजण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. सदरील उद्दिष्टपैकी अद्याप पावेतो उपलब्ध टक्केवारी नुसार सरासरी 80% मुलांना पोलिओ लस पाजण्यात आले.
शासनामार्फत 2,50,000 पोलीस डोस प्राप्त झाले असून प्रत्येक आरोग्य केंद्रनिहाय आवश्यकतेनुसार वाटप करण्यात आले होते. सदरील मोहीम यशस्वी करण्यासाठी एकूण 41 रिपोर्टिंग युनिटच्या अंतर्गत एकूण 689 पोलिओ बूथ ठेवण्यात आले होते. या ठिकाणी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पोलिओ डोस पाजण्यात आले. तसेच या मोहिमेत रेल्वे स्टेशन, बस स्थानक, विमानतळ, टोलनाके, मॉल अशा 125 ठिकाणी बालकांना डोस पाजण्यासाठी ट्रान्झिट टीमची व्यवस्था करण्यात आली होती.
याशिवाय 22 मोबाईल टीम द्वारे स्थलांतरित व वीटभट्ट्या बांधकाम सुरू असलेले ठिकाणी, तांडे वस्त्या या ठिकाणी पोलिओ डोस पाजण्याची व्यवस्था करण्यात आली
होती.
What's Your Reaction?