पश्चिम विधानसभा मतदारसंघात रमेश गायकवाड यांची जनसंवाद यात्रा, तयारी निवडणुकीची

 0
पश्चिम विधानसभा मतदारसंघात रमेश गायकवाड यांची जनसंवाद यात्रा, तयारी निवडणुकीची

पश्चिम विधानसभा मतदारसंघात रमेश गायकवाड यांची जनसंवाद यात्रा, तयारी निवडणुकीची...

आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी गायकवाड यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज ) माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड हे उद्यापासून औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढणार आहे. अशी माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.

त्यांनी पुढे सांगितले या मतदारसंघात पाण्याची समस्या, रस्ते, गुंठेवारी, आरोग्य सुविधा , शिक्षण अशा विविध समस्यांनी येथील नागरीक त्रस्त झाले आहेत. आमदार संजय सिरसाट यांनी मागिल 15 वर्षांपासून प्राथमिक आरोग्य व प्राथमिक शिक्षण पण येथील नागरिकांना दिले नाही. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पावसाळ्यात सातारा, देवळाई, मिटमिटा भागातील रस्ते चिखलमय झाले आहे. गुंठेवारी कायदा अंतर्गत लाखो रुपये उकळले जात आहे म्हणून येथील नागरी वस्ती गुंठेवारी मुक्त करायची आहे. मुबलक पाणी, चकाचक रस्ते अनेक नागरी समस्या सोडविण्यासाठी हि जनसंवाद यात्रेनिमित्त नागरीकांशी संवाद साधणार आहे. गांधेली येथून उद्या सकाळी 8 वाजता या जनसंवाद यात्रेची सुरुवात होणार आहे. मतदार संघातील प्रत्येक वार्डात हि यात्रा जाणार आहे. 20 सप्टेंबर रोजी काल्डा काॅर्नर येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. अशी माहिती गायकवाड यांनी यावेळी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow