प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना प्रवेशित करावे- मनपा उपायुक्त अंकुश पांढरे

 0
प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना प्रवेशित करावे- मनपा उपायुक्त अंकुश पांढरे

प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना प्रवेशित करावे- उप आयुक्त अंकुश पांढरे

औरंगाबाद, दि.14(डि-24 न्यूज) प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशित करावे असे प्रतिपादन आज महानगरपालिकेच्या वतीने शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी केले.

 महानगरपालिकेच्या शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा दिनांक १८ एप्रिल २०२४ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. त्यापूर्वी सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर येथे मनपा स्तर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रशिक्षणासाठी प्रत्येक केंद्रीय शाळेमधून दोन मुख्याध्यापक ,शिक्षक, बालताई आणि प्रकल्प विभागा अंतर्गत चालवीत असणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्या प्रसंगी उपायुक्त अंकुश पांढरे बोलत होते.ते म्हणाले की महानगरपालिकेच्या शाळा स्मार्ट झाल्या असून या शाळांमध्ये आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबविले जात आहेत आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे .पुढच्याही वर्षी महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थी वाढविण्यासाठी शाळा पूर्व तयारी मेळावा मध्ये प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली मध्ये प्रवेशित करून घेण्यात यावे तसेच शाळेमध्ये समर कॅम्प सोबतच प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात यावे. या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता वैशाली जाहगीरदार , शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे, कार्यक्रमाधिकारी ज्ञानदेव सांगळे उपस्थित होते. तसेच, रेणुका कागदे ,सुशील मोरे, शिल्पा मोगरकर अंजली सोनवणे यांनी सुलभक म्हणून काम पाहिले तर फहीम अन्सारी, युवराज बबजे, सतीश भाले, योगेश जडे यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow