बाबाजानी दुर्राणी यांची झाली घरवापसी, शरद पवारांची भेट घेऊन घेतला प्रवेश
 
                                बाबाजानी दुर्राणी यांची झाली घरवापसी, शरद पवारांची भेट घेऊन घेतला प्रवेश
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.27(डि-24 न्यूज) अजित पवार गटातून आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षात आज माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी प्रवेश करुन घरवापसी केली आहे. यामुळे अजित पवार यांना धक्का मानला जात आहे.
विधानपरिषद सदस्यपद गेल्यानंतर पुन्हा उमेदवारी मिळाली नसल्याने समाजात नाराजी पसरली होती यामुळे त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी बंद दाराआड त्यांनी चर्चा केली. शरद पवार औरंगाबाद दौ-यावर आले असता त्यांनी भेट घेऊन पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात पक्षाला ताकत मिळेल असे बोलले जात आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी येथून एकदा ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते तर दोनदा विधानपरिषदेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            