बारावीची परीक्षा सुरु, सामुहिक काॅपी करताना सिसिटीवीत कैद, 19 जणांविरुद्ध पथकाची कारवाई...

 0
बारावीची परीक्षा सुरु, सामुहिक काॅपी करताना सिसिटीवीत कैद, 19 जणांविरुद्ध पथकाची कारवाई...

बारावीची परीक्षा सुरु, काॅपी करताना सिसिटीवीत कैद, 19 जणांविरुद्ध पथकाची कारवाई...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि.10(डि-24 न्यूज):- आजपासून बारावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली. आज इंग्रजीचा पहिला पेपर होता. पहिल्याच दिवशी परीक्षा केंद्रावर गैरप्रकार करताना सिसिटीवीत कैद झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. आज पालक व विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राचा पत्ता छत्रपती संभाजीनगर शहरात सापडत नसल्याने तारांबळ उडाली. टाऊन हॉल येथे मौलाना आझाद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आहे. हाॅल तिकीटावर फक्त मौलाना आझाद काॅलेज उल्लेख असल्याने काही पालक रोजाबाग येथील मौलाना आझाद काॅलेज परीक्षा केंद्रावर पोहोचले तेथे परीक्षा केंद्राचा पत्ता चूक असल्याने परत टाऊन हॉल येथे आले समोरुन गेट बंद असल्याने मागिल गेटवर येण्यात वेळ घालवला. यामुळे अर्धा पाऊण तास गेला अशी तक्रार एड उमरीकर व काही पालकांनी केली. 10.30 च्या अगोदर परीक्षा केंद्र गाठले म्हणून पेपर झाला असे त्यांनी सांगितले. बोर्डाच्या चुकीमुळे त्रास सहन करावा लागला असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील इयत्ता 12 वीच्या परीक्षेदरम्यान आढळून आलेल्या गैरप्रकाराच्या प्रकरणात दक्षता समितीच्या आदेशानुसार जिल्ह्यातील आजवरची सर्वात मोठी आणि कठोर परीक्षा-संबंधित कारवाई करण्यात आली आहे.

कन्नड तालुक्यातील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय, जैतापूर येथे इंग्रजी विषयाच्या परीक्षेदरम्यान काही विद्यार्थ्यांकडून नक्कल होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने तातडीने तपासणी सुरू केली.

CCTV फुटेजमुळे गैरप्रकार उघड

परीक्षा केंद्रावर उपलब्ध असलेल्या CCTV फुटेज व उत्तरांच्या झेरॉक्स प्रतींच्या आधारे सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीत विद्यार्थ्यांकडून एकमेकांच्या उत्तरपत्रिकांकडे पाहून गैरप्रकार केल्याचे स्पष्ट झाले.

केंद्र संचालकासह 19 जणांवर कारवाई प्रस्तावित...

या प्रकरणात परीक्षा केंद्र संचालकासह एकूण 19 पर्यवेक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या पर्यवेक्षक शिक्षकांविरुद्ध निलंबनाचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. तसेच इतर संस्थांतील कर्मचाऱ्यांविरोधात त्यांच्या संस्थेमार्फत शिस्तभंगात्मक व कायदेशीर कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत.

संपूर्ण स्टाफ बदलला; पुढील परीक्षा कडक देखरेखीखाली...

गैरप्रकाराची गंभीरता लक्षात घेता प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत परीक्षा केंद्रावरील संपूर्ण स्टाफ बदलून नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांना परीक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

“उपरवाला सब देख रहा है”चा प्रत्यय देणारी घटना...

ही कारवाई शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती अश्विनी लाठकर यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने केली असून, दक्षता समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, विभागीय बोर्ड अध्यक्ष श्री अनिल साबळे यांच्या आदेशानुसार ही कठोर कारवाई राबविण्यात आली.

CCTV च्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात असल्याने परीक्षा प्रक्रियेत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे. परीक्षा केंद्रावर सिसिटीवी लावण्यात आले आहेत असे गैरप्रकार आढळून आल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

पारदर्शक परीक्षा प्रक्रिया ही सामूहिक जबाबदारी...

या घटनेतून सर्व परीक्षा केंद्र संचालक, पर्यवेक्षक व संबंधित घटकांनी भविष्यात परीक्षा पारदर्शक, शिस्तबद्ध आणि नियमांनुसार घेणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow