बेपत्ता महिलेची माहिती कळविण्याचे आवाहन....
बेपत्ता महिलेची माहिती कळविण्याचे आवाहन...
छत्रपती संभाजीनगर, दि.22(डि-24)- सिटी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील एक महिला दि.20 जानेवारी पासून राहत्या घरातून कोणासही न सांगता निघुन गेल्याने बेपत्ता झाली आहे, यासंदर्भात या महिलेचा पती शफिक शाह सलिम शाह रा. जुना बाजार,हेड पोस्ट ऑफीससमोर नूर कॉलनी , छत्रपती संभाजीनगर यांनी सिटी चौक पोलीस स्टेशन मध्ये खबर दिली. त्यानुसार फातेमा बेगम शफिक शाह वय 21 वर्षे ही महिला रंग गोरा, बांधा मध्यम, उंची 5 फुट 2 इंच, नाक सरळ, डोळे काळे, चेहरा गोल, केस काळे, हिंदी भाषा बोलते, अंगात ग्रे रंगाची सलवार त्यावर पांढ़ऱ्या रंगाचा फुले असलेला टॉप व काळ्या रंगाचा बुरखा , पायात काळ्या व पांढऱ्या रंगाची सॅंडल, सोबत आधार कार्ड, टीसी, फोटो, पॅन कार्ड, मतदान कार्ड असलेली गुलाबी रंगाची स्कूल बॅग, शिक्षण 2 वी, सोबत ओप्पो कंपनीचा मोबाईल. वरील वर्णनाच्या महिलेबाबत माहिती आढळल्यास सिटी पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार सुधाकर मिसाळ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?