बौध्द लेणी बचाव महामोर्चात लाखो बौध्द अनुयायी रस्त्यावर...4 तास ट्राफीक जाम
बौध्द लेणी बचाव महामोर्चात लाखो बौध्द अनुयायी रस्त्यावर...
लहाना बालक, महीला वयोवृध्दांपर्यत महामोर्चात सहभागी, मोर्चाला काँग्रेस, शिवसेना उध्दव गट, एमआयएम व विविध पक्ष संघटनांनी दिला पाठींबा.... रस्त्यावर जेव्हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जात असताना आजूबाजूचे रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली.... तब्बल शहरातील चार तास ट्राफीक जाम झाल्याने पोलीसांची वाहतूक वळवण्यासाठी तारांबळ उडाली, मोर्चात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.7(डि-24 न्यूज)
बौध्द लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुध्दविहार आणि विपश्यना केंद्राला जवळपास 70 वर्षाचा कालावधी झाला आहे. ही बुध्दभूमी उध्दवस्त करण्याचे षडयंत्र रचणा-याचा छडा लावा, बुद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध विहार व भिक्खु कुटीला अतिक्रमित संबोधून नोटीस दिल्याच्या निषेधार्थ लाखो बौध्द उपासक -उपासिका अनुयायी व शहरातील विविध पक्ष संघटना एकवटले. बौध्द लेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहाराला पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 50 एकर जगा देण्यात यावी, बौध्द लेणी व परिसराचा समावेश बुध्दिस्ट सर्किट मध्ये करण्यात यावा. अजिंठा लेणीच्या मार्गावरील हर्सुल टी पॉईट येथे भव्य बुध्द मूर्ती स्थापन करण्यात यावी या सह विविध मागण्यासाठी आज दुपारी वाजता क्रांतीचौकातून भदन्त विशुध्दानंद बोधी महास्थवीर यांच्या नेतृत्वाखाली लाखो उपासक -उपासिकांच्या उपस्थित महामोर्चाला सुरूवात झाली.
या महामोर्चाचे नेतृत्व भदन्त विशुध्दानंद बोधी महास्थवीर यांनी केले. या महामोर्चात भिक्खू संघही मोठया संख्येने सहभागी झाले होेते.
मोर्चात विविध पक्ष, आंबेडकरी पक्ष संघटना गट तट विसरून सहभागी झाले होते. या महामोेर्चात शहर व जिल्हयासह संपूर्ण मराठवाडयासह अन्य ठिकणाहूनही अनुयायानी हजेरी लावली. मोर्चात सहभागी होण्यासाठी सकाळी 10 वाजेपासून विविध वसाहतीतून जत्था जथ्याने कार्यकर्ते येत होते. गळ्यात निळा रुमाल, हातात निळे झेंडे होते. बाहेर गावाहून येणारे मोर्चेकरी सिडको बसस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक येथून निघाल्यानंतर थेट क्रांतीचौकात महामोर्चात सहभागी होत होते. मोर्चा इतका भव्य होता, की ही मोर्चेक-याची रांग किमान पाच किलोमीटरपर्यंत दिसत होती. मोर्चा दिल्लीगेट येथे पोहचल्यानंतर शेवटचे टोक हे क्रांतीचौकापर्यत होते.
पचरंगी - निळे ध्वज डौलाने फडकले
या महामोर्चात सहभागी होण्यासाठी लहान मुलांपासून ते वयोवृध्दानी उत्सफूर्त पणे सहभाग घेतल्याचे दिसून आले. मोर्चात सहभागी झालेल्या उपासकाच्या हातात पचरंगी ध्वजासह निळे झेंडे डोलाने फड़कत होते. तर काही जणांनी हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घेत जबतक सुरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा आदि घोषणा देत होते. मोर्चात सहभागी झालेल्या उपासक - उपासिकांनी हाती फलक घेतले होते. त्या फलकावर बौध्दलेणीच्या पायथ्याशी पायभूत निर्माण करण्यासाठी 50 एकर जागा देण्यात यावी, बौध्दलेणी व परिसराचा समावेश बुध्दिस्ट सर्किट मध्ये करण्यात यावा, बौध्द लेणी व परिसरचा पर्यटन स्थळ व तिर्थक्षेत्राच्या यादीत समावेश करण्यात यावा, बौध्द लेणीत पायाभूत सुविधा उभारून अजिंठा लेणीच्या धर्तीवर प्रकाश योजना करून लेणीच्या डोंगराच्या संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद करावी, अजिंठा लेणी मार्गावरील हर्सुल टी पॉईट येथे भव्य बुध्द मूर्तीची स्थापना करण्यात यावी यासह एकूण सात मागण्याचे फलक महिला पुरूषासह बालकांच्या हातात झळकत होते.
गगनभेदी घोषणाबाजीने शहर दणाणले.
मोर्चात सहभागी झालेले उपासक उपासिका बुध्दलेणी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जबतक सुरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, बोल दलिता हल्ला बोल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो , जोर से बोलो जयभीम, जयभीम -जयभीम, बोलो रे बोलो जयभीम सारे बोलो जयभीम आदि गगन भेदी घोषणा देत होते. या गगनभेदी घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
सुट्टीमुळे कुंटूबियासह सहभागी
सोमवारी शाळा व विविध शैक्षणिक संस्थांना जिल्हाधिकारी यांनी सुट्टी जाहिर केल्यामु्ळे अनेक कुंटूबिय हे आपल्या संपूर्ण परिवारासह या महामोर्चात सहभागी झाले होते. मोर्चात लहान मुला- मुलींची लक्षणीय संख्या दिसून आली. अनेक वयोवृध्द हे चालता येत नसतांना सुध्दा बाबासाहेबांसाठी महामोर्चात सहभागी झालो आहोत असे सांगितले. काही जणांचे वय 80 ते 90 पार होते तरी ते या मोर्चात मोठया हिमतीने सहभागी झाले होते.
मराठवाडयातील अनेक जिल्हयातून आले उपासक उपासिका
बुध्दलेणी बचाव महामोर्चात सहभागी होण्यासाठी बीड, परभणी नांदेड, परभणी, जालना, अहील्यानगर(अहमदनगर), धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, हिंगोली आदि जिल्हयातून बौध्द उपासक -उपासिका आले होते. महामोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली.
अल्पोपहार व पाण्याची व्यस्था
महामोर्चाच्या मार्गावर राजू शिंदे यांनी केळी आणि पिण्याच्या बाॅटलचे वाटप केले तर विजय मगरे यांनी क्रांतीचौकात आलेल्या अनुयायासाठी पिण्याच्या पाण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. शिक्षण महर्षी माधवराव बोरडे प्रतिष्ठान व संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाचे अॅड. धनजंय बोरडे यांनी पैठणगेट या ठिकाणी पाण्याच्या बॉटल वाटप केले. तसेच पंकज बन्सोडे यांनी पाण्याचे पाणी वाटप केले. आयटीआय मागासवर्गीय कर्मचारी संघटना, भिमशक्ती संघटना, पदमपुरा मित्र मंडळाच्या वतीने हजारो उपासक -उपासिकाना भोजनदान करण्यात आले.
D24NEWS English News...
Agitation-Buddhist
Protest held by Buddhist worshipers for trespassing notice
Chhatrapati Sambhajinagar(Aurangabad) ,Oct 7 The Buddha Vihara and Vipassana Center at the foot of the Buddha cave has a period of about 60-70 years.
Lakhs of Buddhist worshipers on Monday gathered to protest the trespassing notice of encorchment under the section of 168 by supreme court issued to the Buddha Vihara and Bhikkhu Kuti at the foot of the Buddha cave, pretending to be plotting to destroy this Buddha land.
The protest held for various demands including that 50 acres of land should be given to the vihara at the base of the Buddhist Caves for building infrastructure, the Buddhist Caves and the surrounding area should be included in the Buddhist circuit, and a huge Buddha statue should be installed at Harsul Tea Point on the way to Ajanta Caves.
A grand procession started from Kranti Chowk under the leadership of Bhadanta Vishudhananda Bodhi Mahasthaveer in the presence of lakhs of worshipers. This Mahamorcha was led by Bhadanta Vishudhananda Bodhi Mahasthaveer.
A large number of Bhikkhu Sangha also participated in this grand march.
All the Ambedkari party organization groups participated in the march. Followers from the whole Marathwada along with the city and district also participated in this grand march. Activists were coming in droves from various colonies since the morning to participate in the march.
The marchers coming from outside the village were directly participating in the grand march at Kranti Chowk after leaving from CIDCO bus station, central bus station, railway station.
The procession was so grand that the line of procession could be seen for at least five kilometers. After reaching Delhi Gate, the procession will reach Kranti Chowk.
It was seen that people from children to old age participated enthusiastically to participate in this grand march. Blue flags along with the five-color flag were waved in the hands of the worshipers who participated in the march.
Some people have taking the image of Dr Babasaheb Ambedkar, they were chanting 'Jabatak Suraj Chand Rahega Baba Tera Naam Rahega ', Jor Se Bolo Jayabhim, Jayabhim - Jayabhim, Bolo Re Bolo Jayabhim Sare Bolo Jayabhim etc.
The worshipers who participated in the march carried placards mentioning their various
demands.
What's Your Reaction?