ब्रम्हदेव आला तरी अमरावतीतून माघार नाही - आमदार बच्चू कडू

 0
ब्रम्हदेव आला तरी अमरावतीतून माघार नाही - आमदार बच्चू कडू

ब्रम्हदेव आला तरी अमरावतीतून माघार नाही - आमदार बच्चू कडू

मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत निवडणूक स्वबळावर लढून ताकत दाखवण्याचा निर्धार...

औरंगाबाद, दि.30(डि-24 न्यूज) अमरावती लोकसभा निवडणुकीतून उमेदवार दिला आहे जिंकण्यासाठी तानाशाही विरोधात आमची लढाई आहे. आमचे या मतदारसंघात दोन आमदार आहेत याचा फायदा निवडणुकीत होईल. राजकारणात आमचा कोणी बाप नाही ना कोणी नेता आहे जनताच आमच्यासाठी सर्वकाही आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले अमरावतीची लढत मैत्रीपूर्ण असणार आहे. नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार दिला आहे. त्यामुळे सागर बंगला काय आता ब्रम्हदेव आला तरी माघार नाही असे ते म्हणाले.

त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीत स्वबळावर उतरुन ताकत प्रहारची ताकत दाखवून देण्याचा निर्धार केला. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले मत मांडले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील पदाधिकारी सोबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये अडचणी देखील सांगितले. जालन्याचे खासदार विकास कामांमध्ये अडचणी निर्माण करतात. ग्रामपंचायतींना निधी देत नाही. आलेला निधी काढून घेतला जातो. असे मत कार्यकर्त्यांनी मांडले. हि प्राथमिक बैठक होती आणखी दोन बैठका घेऊन औरंगाबाद व जालना लोकसभा निवडणुकीत उमेदवार द्यायचा किंवा नाही नंतर निर्णय घेऊ. यावेळी पक्षबांधणीवर जोर देणार असल्याचा संकल्प केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow