भरधाव ट्रकने तीन वाहनांना उडवले, संतप्त जमावाने पेटवला ट्रक...
भरधाव ट्रकने तीन वाहनांना उडवले; संतप्त जमावाने पेटवला ट्रक....
पैठण रोडवरील कांचनवाडीजवळील घटना, सुदैवाने जीवीतहानी टळली
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)- भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दोन रिक्षांसह एका कारला उडवले. अपघाताची ही घटना मंगळवार, 13 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पैठण रोडवरील कांचनवाडी येथे घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीत हानी झाली नसल्याची माहिती सातारा पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी दिली आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकला आग लावली होती. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन ट्रकला लागलेली आग विझवली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पैठण रोडवर मंगळवारी दुपारी ट्रक क्रमांक (डीडी-03-आर-9408) हा भरधाव वेगाने जात होता. कांचनवाडीजवळ ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कार क्रमांक (एमएच-20-जीझेड-1231), रिक्षा क्रमांक (एमएच-20-ईके-8613) आणि (एमएच-20-ईके-6210) यांना धडक दिली. ट्रकची धडक इतकी भीषण होती, की कार आणि दोन्ही रिक्षांचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकला आग लावली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर, उपअग्निशमन अधिकारी संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ड्युटी अधिकारी गोरखनाथ जाधव, अग्निशामक जवान अतुल बनकर, विशाल घरडे, रावसाहेब जाधव, मनोज राठोड आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन ट्रकला लागलेली आग विझवली. या अपघातात एक जण जखमी झाला असून वृत्त देईपर्यंत जखमीचे नाव समजू न शकल्याचे सातारा पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी सांगित
ले.
What's Your Reaction?