भाजपा महीला मोर्चाने केले क्रांतीचौकात तीव्र निषेध आंदोलन...

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने केले तीव्र निषेध आंदोलन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींविषयी काँग्रेस पक्षाने गलिच्छ भाषा वापरणे, शिवीगाळ करणे तसेच AI च्या माध्यमातून अपमानास्पद चित्रफिती तयार करून मोदी व त्यांच्या मातोश्रींची बदनामी करण्यात आली. त्याचबरोबर बिहार निवडणुकीच्या संदर्भात जाणीवपूर्वक विष पेरून मातृशक्तीचा अपमान करण्यात आला. या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा शहराच्या वतीने आज क्रांती चौक येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांच्या सुचनेनुसार व भाजपा शहर जिल्हाध्यक्ष श्री. किशोर शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
या आंदोलनात राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे, भाजपा प्रदेश महामंत्री तथा आमदार संजयजी केनेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे, रामेश्वर भादवे, ताराचंद गायकवाड, जालिंदर शेंडगे, तसेच महिला मोर्चा शहर अध्यक्षा डॉ. सौ. उज्वला दहिफळे, महिला मोर्चा ग्रामीण अध्यक्षा सौ. ऐश्वर्याताई गाडेकर, सौ. सविताताई कुलकर्णी, सौ. माधुरीताई आधवंत, सौ. मीना मिसाळ, सौ. अमृता पालोदकर, सौ. छाया खाजेकर, सौ. व्यवहारे ताई, सौ. अर्चना नीलकंठ, सौ. रेखा जैस्वाल, सौ. रुपाली वाहुळे, सौ. वैशाली आराख, सौ. अपर्णा चोबे, सौ. भारतीताई राजपूत, सौ. कविता देशमुख, सौ. सुवर्ण तुपे, सौ. नंदाताई लोखंडे, सौ. ज्योतीताई पवार, सौ. सुनिता औराधे, सौ. हर्षदा राजपूत, सौ. शिल्पाताई, सौ. धनश्री रोंगे, सौ. रितू अग्रवाल, सौ. सारिकाताई देशपांडे, सौ. मंगलाताई आस्वार, सौ. सरिताताई घोडदुरे, सौ. विजयाताई भोसले यांच्यासह सर्व मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे म्हणाले की, “मोदीजी मातृशक्तीचा एवढा आदर करतात की त्यांनी देशभर ‘पेड माँ के नाम’ हे अभियान राबवले. मात्र काँग्रेस पक्ष वेळोवेळी मातृशक्तीचा अपमान करतो. त्याच्या निषेधार्थ महिला मोर्चातर्फे आजचे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे.”
भाजपा शहर जिल्हाध्यक्ष श्री. किशोर शितोळे म्हणाले की, “मातृशक्तीचा अपमान करणाऱ्या काँग्रेस व आरजेडीला भारतीय जनता कधीही माफ करणार नाही. दिवसेंदिवस राजकारणाचा स्तर खाली खेचण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे.”
आमदार श्री. संजय केनेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “राहुल गांधी यांना भारतीय संस्कृतीचा गंधही नाही. ते मातृशक्ती काय असते हे कधीही समजू शकत नाही. म्हणूनच काँग्रेस पक्ष सतत मातृशक्तीचा अपमान करण्याचे धाडस करतो.”
या आंदोलनातून काँग्रेस पक्षाच्या अशोभनीय व असभ्य कृतीचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
What's Your Reaction?






