भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-3 उतरवून रचला इतिहास... देशात जल्लोष

भारताने चंद्राच्या ???? दक्षिण ध्रुवावर चांद्रयान 3 उतरून इतिहास रचला , इस्त्रोचे व 140 कोटी भारतीयांचे स्वप्न पूर्ण, भारताचे चंद्रावर पहिले पाऊल
औरंगाबाद येथे जल्लोष... जागोजागी आनंदोत्सव साजरा... पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार... भारतातील सर्व नागरिकांना डि-24 न्यूज परिवारातर्फे शुभेच्छा...
नवी दिल्ली, दि.23(डि-24 न्यूज) भारताने अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवण्याचा मान पटकावन इतिहास घडविला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या मेहनतीचे आज चीज झाले आहे.
भारतीय चांद्रयान यशस्वीपणे चंद्रावर उतरवण्याचा महत्त्वाचा टप्पा आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी पार पडला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत पहिला देश ठरला. चांद्रयानाचं लँडिंग यशस्वी होणारच असा ठाम विश्वास भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) व्यक्त केला होता तो खरा करुन दाखवला आहे.
इस्त्रोनं सतीश धवन प्रक्षेपण केंद्र श्रीहरी कोटा येथून 14 जुलै रोजी चांद्रयान ३ चे प्रक्षेपण केलं होतं. त्यानंतर आज म्हणजेच 23 ऑगस्टपर्यंत प्रत्येक पातळीवर भारताला यश मिळालं होतं. यावेळी भारतानं ऑर्बिटर न पाठवता प्रॉपल्शन मॉड्यूल पाठवलं होतं. त्यामध्ये देखील अपेक्षेपेक्षा जास्त इंधन शिल्लक राहिले. या इंधनाचा उपयोग करून हे मॉड्यूल चंद्राभोवती पुढील किमान सहा महिने फिरत राहून पृथ्वीचा अभ्यास करणार आहे.
विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हरचा समावेश असलेल्या लँडर मॉड्युललाही अपेक्षित कक्षेत (25 बाय 134 किलोमीटर) पोहोचवण्यात इस्रोच्या शास्त्रज्ञांना यापूर्वीच यश आलं होतं. विक्रम लँडरच्या लँडिंगची सर्व प्रक्रिया लँडरवरील संगणकाच्या नियंत्रणाखाली पार पडली. त्यासाठी आवश्यक आज्ञावली बेंगळुरू येथील इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्कमधून (इसट्रॅक) लँडरकडे पाठवण्यात येत होत्या. बेंगळुरूजवळील ब्याललु येथील डीप स्पेस नेटवर्कच्या साह्याने लँडरशी थेट संपर्क साधून त्यावरील सर्व सेन्सर, कॅमेरा आणि इंजिनांची सातत्याने कसून तपासणी होत होती.
चांद्रयान २ च्या मोहिमेत अपयश आल्यानंतर चांद्रयान-3 च्या मोहिमेत बदल करण्यात आले होते. चांद्रयान-3 ला लँडिंगसाठी जागा निवडण्याचा पर्याय देखील देण्यात आला आहे. याशिवाय चांद्रयान मोहिमेत सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांनी देखील चांद्रयान मोहीम यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोचे व इस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले केले आहे. भारताने चंद्रावर ???? पोहचुन इतिहास घडवल्याने भारतात सर्वच ठिकाणी सर्व शहरांमध्ये नागरिकांनी फटाके फोडीन पेढे वाटून आनंद व जल्लोष साजरा केला आहे.
महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात पेढे वाटून आनंदोत्सव...
चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात बुधवारी जल्लोष करण्यात आला . प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, प्रदेश चिटणीस सुरेश बनकर , किरण पाटील , रामेश्वर भांदरगे , डॉ . सुभाष कदम , शिवाजी दिवटे , राजगौरव वानखेडे , सुनील सकपाळ ,बाळासाहेब भालेराव, एस.एम. खान , प्रदेश कार्यालय सहसचिव भरत राऊत आदी यावेळी उपस्थित होते. शहरातील विविध भागात थेट प्रेक्षपण पाहण्यासाठी एलएडी स्क्रीन टिवी ठेवण्यात आले होते मोहीम यशस्वी झाल्यानंतर जल्लोष करत मिठाई वाटप करत आनंदोत्सव साजरा केला.
What's Your Reaction?






