मंत्री अतुल सावे यांनी केली शहरातील मंदिरांची स्वच्छता...!

मंत्री सावे यांचेकडून मंदिरात स्वच्छता
औरंगाबाद, दि.20(डि-24 न्यूज) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम लल्ला च्या आगमन निमित्त संपूर्ण देशातील मंदिरात स्वच्छता करण्याचे आवाहन प्रत्येक भारतीयांना केले होते. याला प्रतिसाद देत शनिवारी राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांच्या वतीने देखील शहरातील विविध मंदिरात स्वच्छता करण्यात आली.
पूर्व विधानसभा मतदार संघातील एन 1 येथील काळा गणेश मंदिर, एन 8 गणेश नगर येथील सदगुरु हाउसिंग सोसायटी मधील हनुमान मंदिर, विनायक हाउसिंग सोसायटी जवळील पशुपतीनाथ महादेव मंदिर, सिद्धी विनायक मंदिर एन 8, याठिकाणी सकाळी राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. यावेळी मंत्री महोदय यांनी मंदिरातील सभागृह धुवून काढला, काढत हातात झाडू घेऊन मंदिर परिसर स्वच्छ केला.
राजु शिंदे, शिवाजी दांडगे, गणेश नावंदर, नितीन खरात, अरुण पालवे, वर्षा साळुंके, लक्ष्मी गायकवाड, सरिता घोडतुरे, विलास कोरडे, श्रीनिवास कुलकर्णी, प्रदीप ठाकरे, महेश माळवतकर, राजेश मिरकर, लक्ष्मण निकम.
What's Your Reaction?






