मंत्री मंडळ बैठकीवर खडी हातोडा मोर्चा...
मंत्री मंडळ बैठकीवर खडी हातोडा मोर्चा
औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) भारतीय नायकडा आदिवासी व लभाण समाज विकास फाऊंडेशनच्या वतीने आयोजित नायकडा लभाण समाजाचा मंत्रीमंडळावर दुपारी 12 वाजता भडकलगेट येथे खडी-हातोडा मोर्चा काढण्यात आला. शिवराम जाधव यांच्या नेतृत्वाखाली विविध मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. आपल्या पारंपरिक वेशभूषेत व समाजाचे गीत गाऊन महीला भगिनींनी सरकारला जागे करण्याचा प्रयत्न मोर्चात प्रयत्न केला.
त्यांनी निवेदनात मागणी केली या जमातीच्या अडी अडचणी जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी. असंख्य चुका दुरुस्त करून मुळ नायकडा आदिवासी लभान जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे. या जमातीच्या तांडा वस्तींना स्वतंत्र ग्रामपंचायत करुन द्यावे. या जमातींना शासकीय सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर कामापैकी 5 ते 7 टक्के विना निविदा टेंडर कामे देण्यात यावे. शासकीय विविध मंडळावर प्रतिनिधित्व मिळावे. हातफोड खडी कामासाठी नायकडा समाजास गायरान जमिनीमध्ये खदान कामासाठी परवानगी देणे. ब्रिटीश कालीन पासून खडी फोडणारी ह्या जमातीचा दगड उत्पादन करणारी जमात म्हणून नोंद करण्यात यावी. या मागण्या त्यांनी कुटुंबासहीत मोर्चात सहभागी होत करण्यात आली.
मोर्चात फौंडेशनचे अध्यक्ष शिवराम जाधव, रविंद्र राठोड, रमेश आहिरे, दिनेश दळवी, जगदीश राठोड, गणेश जाधव, शिवाजी डांगे, उमाबाई जाधव, संगीता भोसले, जनाबाई डांगे, सुदाम जाधव आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?