मनपाच्या वाहन ताफ्यात 10 बोलेरो वाहने दाखल...
मनपा वाहन ताफ्यात 10 बोलेरो वाहने दाखल
प्रशासक यांच्या हस्ते लोकार्पण
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) - महानगरपालिकेच्या वतीने आज आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते नवीन 10 बोलेरो, 2 रिसायक्लर मशीन व 1 शववाहिनीचे लोकार्पण करण्यात आले.
स्मार्ट सिटी कार्यालय येथे आज वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी शहर अभियंता फारुख खान, उप आयुक्त अंकुश पांढरे, नंदकिशोर भोंबे, कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, उप अभियंता एस के वाईकर, अभियंता प्रेषित वाघमारे, नकुल राठोड , लोखंडे आदी कर्मचारी उपस्थित होते.
1. बोलेरो वाहन :
• छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची 10 कार वाहने ही 13-14 वर्षापेक्षा जास्त वयोमानाची असल्यामुळे वारंवार नादुरुस्त होत होती. तसेच सदरील वाहने ही शासनाच्या नियमानुसार
आगामी 01 वर्षात स्क्रॅप करावी लागणार आहेत. त्यामुळे 10 बोलेरो वाहने जीईएम पोर्टलच्या दरानुसार महिंद्रा कंपनीचे स्थानिक अधिकृत मे.
रत्नप्रभा मोटर्स यांच्याकडुन प्रति नग रु. 9,66,000/- दराने एकुण रुपये 96,66,000/-
रकमेत खरेदी करण्यात आलेली आहेत.सदरील वाहने ही महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंते, उपायुक्त यांना कार्यालयीन कामकाजाच्या वापरासाठी देण्यात येणार आहेत.
2. रिसायक्लर मशिन :
महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी ड्रेनेज संबंधित तक्रारींचे निवारण
करण्यासाठी 02 रिसायक्लर मशिन दिलेले आहेत.
सदरील रिसायक्लर मशिनद्वारे शहरातील ड्रेनेज चोकअप तक्रारींचे निवारण करणे, तुंबलेले
पाणी काढणे, सेप्टीक टँक स्वच्छ करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत.
रिसायक्लर मशिन यामध्ये जेटिंग व व्हॅक्युम या दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत.
3. शववाहिनी :
महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी 1 शववाहिनी दिलेली आहे.
सदरील शववाहिनी ही आरोग्य विभागास देण्यात येणार असुन, यामुळे मृत शरीरास व्यवस्थित
रित्या वाहतुक करणे सोईस्कर होणार आहे.
अशी माहिती कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांनी दिली आहे.
What's Your Reaction?