मनपाच्या विद्यार्थ्यांचे नायलॉन मांजा वापरु नका पथनाट्य सादर करुन विद्यालयात पतंगोत्सव

 0
मनपाच्या विद्यार्थ्यांचे नायलॉन मांजा वापरु नका पथनाट्य सादर करुन विद्यालयात पतंगोत्सव

मनपा प्रियदर्शनी विद्यालयात पर्यावरण स्नेही पतंगोत्सव...

नायलॉन मांजा वापरू नका पथनाट्या द्वारे विद्यार्थ्यांचे आवाहन

 

औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) महानगरपालिका प्रियदर्शनी इंदिरानगर शाळेत मकर संक्रांती निमित्ताने पतंग उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्राथमिक माध्यमिक व सीबीएससीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पतंग उडविण्याचा आनंद घेतला.

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार तसेच महिला शिक्षिका यांनी सुध्दा पतंग उडविण्याचा आनंद घेतला. 

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजाचा दुष्परिणाम लक्षात घेऊन तो न वापरण्याचा निर्धार केला व साधा मांजा पतंग उडवण्यासाठी वापरला. नायलॉन मांजा वापरल्यास होणारे दुष्परिणाम यावर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ याप्रसंगी घेतली. आपल्या परिसरात नायलॉन मांजा न वापरा संबंधी जनजागृती करू अशी प्रतिज्ञा केली. अशाप्रकारे मकर संक्रांतीनिमित्त पर्यावरण स्नेही पतंग उत्सव साजरा केला.

 या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश इंगळे, संगीता चौधरी ,किरण पवार ,शोभा निकम, स्मिता मुळे, व मनीषा नगरकर यांनी परिश्रम घेतले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow