मनपाने धडक कारवाई करत जप्त केला प्रतिबंधित 850 किलो प्लास्टिक...
850 किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त...
मनपाची धडक कारवाई...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14 (डि-24 न्यूज)- महानगरपालिकेच्या नागरी मित्र पथकाने आज परत एकदा धडक कारवाई करत 850 किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त केले.
आज दुपार दरम्यान नागरी मित्र पथकाचे कर्मचारी गस्तीवर असताना क्रांती चौक उड्डाण पुलाजवळ एम एच 48 टी 9472 या नंबरचे महिंद्रा पिक अप गाडी मध्ये अवैधरित्या प्रतिबंधित प्लॅस्टिक वाहतूक करण्यात येत होती. गस्ती पथकाला या वाहनाचा संशय आल्याने वाहनाची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित प्लॅस्टिक च्या 33 गोण्या आढळून आल्या.यात 850 किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक आढळून आले. सदर गोण्या जप्त करण्यात येऊन सबंधित यांचे कडून रु.15000 दंड वसूल करण्यात आला.
काल सदर पथकाने जिनसी पोलिस यांच्या मदतीने 450 किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त केले होते.
सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत व उप आयुक्त तथा घन कचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव,कर्मचारी आबाराव सोळुंके,रामराव सुरे,मोतीलाल बकले, अंजुम इनामदार ,भुजंग यांनी पार पाडली.
What's Your Reaction?