मनपा आयुक्तांची विद्यार्थीनीने घेतली मुलाखत...
मनपा शाळेतील विद्यार्थिनीने घेतली आयुक्त तथा प्रशासक यांची मुलाखत...
फुटबॉल शाळा किराडपुरा no 1 शाळेने दिली प्रशासक यांच्या जलश्री निवासस्थानी भेट...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) - महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून
मी आयुक्त होणार...
या नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत शनिवारी दि 8 नोव्हेंबर रोजी मनपा के.प्रा. शाळा किराडपुरा न 1 ( फुटबॉल )शाळेने आयुक्तांच्या निवासस्थानी जलश्री येथे भेट दिली.
या शाळेतील विद्यार्थी सकाळी आल्याबरोबर ग्राउंड पाहताच खूप खूष झाले. लगेचच विद्यार्थी फुटबॉल खेळू लागले तर विद्यार्थिनी बॉल बॅडमिंटन खेळू लागल्या.
विद्यार्थी फुटबॉल खूप छान खेळत होते त्यातील झीशान शफीउद्दीन हा विद्यार्थी किराडपुरा संघाचा कॅप्टन असून याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
या शाळेतील मुली विभाग स्तरावर शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धा साठी जिल्हा स्तरावर जिंकून पात्र झालेल्या आहेत. त्यांनी ही तेथे छान खेळ खेळला.
नुकताच लोकमत समूहातर्फे कॅम्पस क्लब मध्ये आयोजित अंतर शालेय क्रिकेट स्पर्धा मध्ये जिंकलेला संघ किराडपुरा शाळेचा होता. त्यामधील विद्यार्थ्यांनी क्रिकेट खेळ खेळला.
सर्वांनी एकत्रित रस्सीखेच खेळल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकत्रित निसर्ग भोजन घेतले व त्या नंतर विद्यार्थ्यांनी आयुक्त सोबत संवाद साधला. तेथे आयुक्त आणि विद्यार्थ्या मध्ये प्रेरणादायी संवाद सुरू झाला आणि तेवढ्यात या शाळेतील इयत्ता दहावी मधील नूरिन सय्यद या विद्यार्थिनीने सर मला तुमची मुलखात घ्यायची आहे तुमची परवानगी असेल तर घेते, ती म्हणाली.
प्रशासक जी श्रीकांत यांनी तिला परवानगी दिली आणि मुलाखतिला सुरुवात झाली. नूरिन या मुलीने इंग्रजी भाषेत आत्मविश्वासाने वेगवगेळे प्रश्न विचारून सरांचे शाळेबाबत आणि शहरामध्ये केलेल्या विकासा बाबत आणि पुढे असलेल्या vision बाबत मुलाखत घेतली . इयत्ता पाचवी मधील पाच विद्यार्थी व तीन मुलींनी आयुक्त तथा प्रशासक म्हणून घेतलेल्या निर्णयावर व झालेल्या विकासावर अतिशय सुंदर नाटिका सादर केली . तसेच "मैं हिंदी की बेटी हुं जीसे उर्दू ने पाला है" हे अतिशय छान आवाजात अकसा शेख या मुलीने गीत गायले . प्रेरणादायी संवाद मध्ये प्रशासक महोदयांनी तुमच्या शाळेत सर्वात बेस्ट काय आहे विचारले असता विद्यार्थ्यांनी ग्राउंड उत्तर दिले तर काही विद्यार्थ्यांनी डिजिटल( smart)बोर्ड उत्तर दिले .जी श्रीकांत यांनी आयुक्त बनवून घेतलेल्या निर्णयाबाबत मुलाखती मध्ये सांगितले होते, म्हणून एक विद्यार्थिनी म्हणाली की सर मी आतापासूनच स्पर्धा परीक्षेचे क्लास लावले आहेत आणि भविष्यात मला तुमच्या सारखे आयुक्त व्हायचे आहे आणि तुम्ही आमचे रोल मॉडेल असणार आहेत. तिला प्रशासकांनी भरपूर अभ्यास करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. एक विद्यार्थ्यांनी मला नर्स व्हायचे आहे म्हणली असता त्यांनी तिला पहिली नर्स कोण आहे जिला भारतरत्न मिळाला आहे असे विचारले असता एका मुलीने मदर टेरेसा उत्तर दिल्याबरोबर तिला सरांनी एक भेटवस्तू बक्षीस दिली. आणि त्या नंतर सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या विद्यार्थीही खूप खूप आनंदित होऊन घरी परतले.
यावेळी कल्पिता पिंपळे अतिरिक्त आयुक्त, अंकुश पांढरे उप आयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख, नंदकिशोर भोंबे उप आयुक्त तथा घनकचरा विभाग प्रमुख, गणेश दांडगे नियंत्रण अधिकारी, भारत तिनगोटे शिक्षणाधिकारी, तौसीफ अहमद जनसंपर्क अधिकारी, ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी तसेच खान रईसा बेगम केंद्रीय मुख्याध्यापक, माव्हिया तब्बसुम आणि यास्मिन
मॅडम, आखेब खान क्रीडा प्रशिक्षक शिंदे सर संगीत प्रशिक्षक. इलियास सेवक उपस्थित होते
.
What's Your Reaction?